आरोग्य

Cardiac Arrest vs Heart Attack : कार्डियाक अरेस्ट अन् हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे? कोणता आहे सर्वात जास्त धोकादायक

सकाळ डिजिटल टीम

Cardiac Arrest vs Heart Attack : बॉलीवुड अभिनेता सतीश कौशिक याचं वयाच्या 66 कार्डियाक अरेस्टनी निधन झालं. मागील एक दोन वर्षापासून हार्टनी संबंधीत आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनानंतर तर कार्डियाक अरेस्टच्या प्रकरणात खूप जास्त तेजी दिसून येत आहे. एवढंच काय तर तरुण मंडळीही याचा शिकार होत आहे.

अनेकजण हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये कन्फ्यूज असतात मात्र या दोन्ही गोष्टीत खूप अंतर आहे. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (difference between Cardiac Arrest and Heart Attack read which one is more risky )

कार्डियाक अरेस्ट काय असतो?

जेव्हा माणसाचं हार्ट बीट थांबते आणि त्यामुळे शरिराच्या बाकी अवयवांपर्यंक रक्त पोहचत नाही. अशावेळी कार्डियाक अरेस्ट येतो. जेव्हा व्यक्तीला कार्डियक अरेस्ट येतो तेव्हा तो दहा मिनिटे बेशुद्ध असतो. विशेष म्हणजे या दरम्यान व्यक्तीला उपचार मिळाले नाही तर व्यक्तीचा मृत्यूही होतो.

कार्डियाक अरेस्ट कोणालाही येऊ शकतो. अनेकदा हार्ट अटॅकही याचं कारण असू शकते. सकता है. जेव्हा व्यक्तीला हार्ट संबंधीत आजार असतो तेव्हा कार्डियाक अरेस्ट येण्याचा सर्वात जास्त धोका असतो.

हार्ट अटॅक काय असतो?

हार्ट अटॅक कार्डियाक अरेस्टपेक्षा वेगळा असतो आणि कार्डियाक अरेस्टपेक्षा कमी धोकादायक असतो. जेव्हा व्यक्तीच्या हार्टपर्यंत रक्त पोहचवणाऱ्या वाहिन्या १०० टक्के ब्लॉक होतात, अशा वेळी व्यक्तीला हार्ट अटॅक येतो.

हार्ट अटॅक येण्यापूर्वी व्यक्तीला काही लक्षणे दिसतात. ज्यामध्ये छातीत दुखणे, छाती भरुन येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे किंवा उलटी होणे, इत्यादी.

हार्ट अटॅक येण्यामागील मुख्य कारण म्हणजे आपली चुकीची लाइफस्टाइल. त्यामुळे योग्य लाइफस्टाईल असणे गरजेचे आहे. चुकीचं डाएट, झोप व्यवस्थित न घेणे किंवा एक्सरसाइज न करणे, यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

कार्डियाक अरेस्ट और हार्ट अटॅक पासून वाचण्यासाठई आपली लाइफस्टाइलला हेल्दी ठेवा आणि योग्य आहार घ्या. दररोज एक्सरसाइज करा, वजन कंट्रोलमध्ये ठेवा. स्ट्रेसपासून दूर रहा. स्मोकिंग-अल्कोहलचं सेवन करू नये.

वेळोवेळी डॉक्टरांशी संपर्क करा. जर कोणाला कोरोनरी आर्टरी डिसिज असेल किंवा हार्ट संबधित आजार असेल तर वेळोवेळी चेकअप करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT