Why Work Life Balance is Important  Sakal
आरोग्य

Work Life Balance : कामानंतर ‘स्वतःसाठी वेळ’ का आवश्यक आहे? जाणून घ्या डिस्कनेक्ट होण्याचे फायदे

Digital Detox Benefits: कामानंतर स्वतःसाठी वेळ घेण्याचे आरोग्यावर होणारे फायदे जाणून घ्या.

Anushka Tapshalkar

Why Disconnecting After Work Is Important: आजकाल सगळीकडेच कामाच्या वेळा बदलत आहेत. याशिवाय कामाच्या वेळेव्यतिरिक्त काम करणे, एक्सट्रा टाइम करणे किंवा दिवसभरात कधीही काम करणे, अशी जीवनशैली झाली आहे.

परंतु, काम संपल्यावर डोकं आणि शरीराला आराम देऊन, कामापासून दूर ठेवणे आरोग्य जपण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात समतोल राखण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. हे वाचायला विरोधाभासी वाटेल, पण कामाच्या बाहेर स्वतःला वेळे देणे तुम्हाला काम करण्यासाठी अधिक कार्यक्षम बनवते.

मध्यंतरी काही उद्योगपतींनी कामाचे तास वाढवून काम करणे चांगला विकास घडवून आणते असे म्हणले आहे. परंतु हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. जेव्हा आपण शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य जपतो, तेव्हा आपण जास्त उत्पादक, लक्ष केंद्रित करणारे आणि कामात गुंतलेले राहू शकतो. जर आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर थकवा किंवा इतर आजार होण्याची शक्यता असते. ज्यामुळे कामावर परिणाम होतो. म्हणूनच कामानंतर स्वतःला डिस्कनेक्ट करणे महत्त्वाचे आहे.

डिस्कनेक्ट होणे तुमचे काम अधिक चांगले बनवू शकते

कामामध्ये झोकून देणे जितके गरजेचे आहे, तितकेच कामानंतर स्वतःसाठी वेळ काढणेही महत्त्वाचे आहे. स्वतःच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेतली, तर तुम्ही अधिक समाधानी आणि प्रभावी पद्धतीने काम करू शकता. आरोग्य चांगलं असेल तरच आपण आपल्या सर्व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडू शकतो.

त्यामुळे डिस्कनेक्ट होण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया:

तणाव व चिंता कमी होते

कामाशी सतत जोडलेले राहिल्यास शरीरातील 'कोर्टिसोल' (तणाव निर्माण करणारा हार्मोन) वाढतो. डिस्कनेक्ट झाल्याने हा हार्मोन कमी होतो, आणि मन शांत राहते.

झोपेचा दर्जा सुधारतो

कामाचा ताण झोपेवर परिणाम करतो. डिस्कनेक्ट झाल्यास मन शांत होते, झोप चांगली लागते आणि आरोग्य सुधारते.

बर्नआउट होण्यापासून संरक्षण

सतत कामात गुंतलेल्यांना थकवा जाणवतो. डिस्कनेक्ट होणे ही विश्रांतीची संधी देते, ज्यामुळे शरीर आणि मन पुन्हा ताजे होते.

मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते

मेडिटेशन, वॉक, व्यायाम, मित्र-परिवारासोबत वेळ घालवणं हे सर्व तुमच्या मानसिक आरोग्यास मदत करतात.

एकाग्रता व विचारशक्ती सुधारते

ब्रेनला वेळ दिल्यास तो अधिक स्पष्ट व तीव्र कार्य करतो.

नाती घट्ट होतात

कामाबाहेरील वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत घालवला तर मन आनंदी राहतं आणि भावनिक आधारही मिळतो.

भावनिक स्थैर्य वाढते

ब्रेक्स घेतल्यामुळे तुम्ही भावनांना योग्य प्रकारे हाताळू शकता आणि तणावाचा सामना अधिक सकारात्मक पद्धतीने करता येतो.

सर्जनशीलता वाढते

सतत कामात राहिल्यास मेंदू ठराविक साच्यात अडकतो. ब्रेक घेतल्यास नवीन कल्पना सुचतात.

जेव्हा तुम्ही कामातून वेळ काढता, तेव्हा फक्त शरीर नाही, तर मनही 'रिचार्ज' होते. नवीन कल्पना सुचतात, आणि कामातही पुन्हा नव्या उमेदीने उतरणे शक्य होते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे ही आरोग्यासाठी आणि यशस्वी आयुष्यसाठीची गुरुकिल्ली आहे. म्हणून यावर्षी जागतिक आरोग्यदिनी दररोज स्वतःसाठी वेळ काढण्याचा संकल्प करा आणि निरोगी आयुष्य जगा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Jayakumar Gore: ‘उन्होंने खुद के गिरेबान में झाँकना चाहिये...’; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा धैर्यशील मोहिते-पाटलांना टोला

Punjab Floods : पंजाबमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात, लासलगावहून ४० टन कांदा रवाना; व्यापाऱ्यांचा पुढाकार

आयुषचा मृतदेह हत्येच्या ३ दिवसानंतरही ससूनमध्येच, अंत्यसंस्काराला इतका वेळ का?

IPS Anjana Krishna: 'आयपीएस अंजना कृष्णा यांना समर्थन वाढू लागले'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची संभाषणाची क्लिप देशभर व्हायरल

Maratha Reservation : मराठा आरक्षण, १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २७ मराठा कुटुंबांना मदतीचा दिलासा

SCROLL FOR NEXT