E-Cigarette esakal
आरोग्य

E-Cigarette : क्रेझ म्हणून ई सिगारेट किती धोक्याची? WHO सह प्रमुख संघटनांनी सांगितलं कारण

आजकाल तरुण स्टाइल मारण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात

सकाळ डिजिटल टीम

E-Cigarette : आजकाल तरुण स्टाइल मारण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात याचा काही नेम नाही, नवीन नवीन कॉलेज मध्ये गेलेली मूल इतरांच बघून सिगारेट मारायला सुरुवात करतात, आणि मग ते एक व्यसन होतं. त्यात आता नवीन प्रकार त्यांना सापडला आहे आणि तो म्हणजे ई सिगारेट डिवाइस.

ई सिगारेट किंवा इलेक्ट्रोनिक निकोटीन डिलीवरी सिस्टम अशी याची नाव आहेत. या ई सिगारेटचा तरूणांमधला वापर भारतासाठीच नव्हे तर जगासाठीची खूप मोठी समस्या झाली आहे. या डिवाइसच्या निर्मिती कंपन्यांनी असा दावा केलेला की हे डिवाइस वापरण धोक्याच नाहीये, पण यावरती आता WHO सकट अनेक संघटनांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तरूणांमधल्या या वाढत्या व्यसनाला रोखण्यासाठी सिंगापूर, ब्राझिल, थायलंड अशा जवळजवळ 45 देशांनी हे ई सिगारेट डिवाइस बॅन केल आहे.

नक्की काय आहे ई सिगारेट?

ई सिगारेट हे एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे जे सिगारेट सारखंच वापरता येतं. हे डिवाइस वेगवेगळ्या आकारात येते, बऱ्यापैकी डिवाइसला आधीच बॅटरी असते. ई-सिगारेट सामान्यत: निकोटीन गरम करून एरोसोल तयार करते.

ई-सिगारेट सेफ असल्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांवर घेतली जाते आहे शंका

आरोग्य तज्ज्ञाच्या मते, ई-सिगारेट कमी हानीकारक असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. ई-सिगारेट मधून बाहेर येणाऱ्या धूरात निकोटीन आणि इतर विषारी पदार्थ असतात जे ई सिगारेट वापरणाऱ्यांसाठी आणि न वापरणाऱ्यांसाठी दोघांसाठीही घातक आहेत.

यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) यूएसमधील ई-सिगारेट निर्माते, JUUL च्या अर्जावर अजूनही सऱ्व्हे करता आहे. FDA ने जून 2022 मध्ये असेही घोषित केले की JUUL च्या अॅप्लिकेशन मध्ये त्यांनी पूर्ण पुरावे दिलेले नाहीत आणि कंपनी काहीतरी लपवते आहे. एजन्सिच्या मते, या कंपनीला बाजारात येऊ न देणच योग्य ठरेल.

आता ई-सिगारेट हे एक फॅशन स्टेटमेंट आणि ऍक्सेसरी बनल आहे शिवाय ते वेगवेगळ्या फ्लेवर्स आणि आकारांमध्ये तरुणांना विकले जाते. टीनेजर्स मध्ये हे प्रमाण वाढते आहे. अमेरिकेतील नॅशनल युथ टोबॅको सर्व्हेनुसार, तब्बल 2.5 दशलक्ष टिनेज मुल ई-सिगारेट वापरतात

WHO च्या मते, ई-सिगारेटचे हानिकारक प्रभाव, मुलांच्या मेंदूच्या विकासात अडथळा आणण्यापासून ते गर्भवती महिलांच्या गर्भावर परिणाम करण्यापर्यंत दिसून आले आहेत. यामुळे अनेक गंभीर आजारही होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT