How to Overcome Fatigue in Early Pregnancy  sakal
आरोग्य

Early Pregnancy Fatigue: प्रेग्नंसीच्या सुरुवातीच्या काळात खूप थकल्यासारखं वाटतंय? मग 'या' सोप्या उपायांनी मिळवा ऊर्जा आणि पुरेशी झोप

How to Reduce Tiredness in Early Pregnancy Naturally: प्रेग्नंसीच्या सुरुवातीला येणाऱ्या थकव्यावर मात करून चांगली झोप आणि ऊर्जा मिळवण्यासाठी हे सोपे उपाय करून पाहा.

Anushka Tapshalkar

Home Remedies for Pregnancy Fatigue and Poor Sleep: प्रेग्नंसीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बहुतांश महिलांना तीव्र थकवा जाणवतो. हार्मोनल बदल, वाढलेली भावनिक आणि शारीरिक जबाबदारी, तसेच झोपेतील व्यत्यय यामुळे हा थकवा अधिक जाणवतो. विशेषतः पहिल्या तिमाहीत, स्त्रियांना दिवसभर झोप येणे, सकाळी उठायला अडचण होणे, आणि काम करण्याची इच्छाही कमी होणे अशा लक्षणांचा अनुभव येतो.

थकवा व झोपेच्या समस्यांचा आईसह बाळावर होणारा परिणाम

प्रेग्नंसीदरम्यान झोपेच्या कमतरतेचा थेट परिणाम बाळाच्या वाढीवर आणि आईच्या आरोग्यावर होतो. झोपेच्या कमतरतेमुळे प्री-एक्लॅम्प्सिया, प्रेग्नंसीतील मधुमेह, अकाली प्रसूती, आणि प्रसववेळी होणाऱ्या गुंतागुंतींचा धोका वाढतो. अनेक महिलांना मळमळ, पाठीचा त्रास, वारंवार लघवीला जावं लागणे, आणि पायात ताण येणं यांसारख्या त्रासांमुळे शांत झोप मिळत नाही.

थकवा घालवण्यासाठी व शांत झोपेसाठी सोपे उपाय

या त्रासांवर मात करण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात.

- सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या गरजा ओळखून वेळेवर विश्रांती घेणे.

- दिवसा थोडावेळ झोप घेणे.

- रात्री शांत झोपेसाठी अंधारी व थंड खोली तयार करणे उपयोगी ठरते.

- झोपेपूर्वी मोबाईल, टीव्ही यांचा वापर टाळावा आणि ध्यान किंवा हलकं वाचन करावं.

- संतुलित आहार घेणं देखील आवश्यक आहे.

- लोहयुक्त अन्नपदार्थ, जसं की बीट, पालक, खजूर यांचा समावेश करावा.

- शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं.

- झोपेसाठी झोपेच्या ठराविक वेळा पाळाव्यात आणि झोपेपूर्वी जड किंवा तिखट पदार्थ टाळावेत.

- थकवा खूपच जाणवत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य पूरक औषधं किंवा टेस्ट्स करून घ्याव्यात. काही प्रकरणांमध्ये अ‍ॅनिमिया, थायरॉईड किंवा इतर हार्मोनल असंतुलन थकव्याचं कारण असू शकतं.

प्रेग्नंसीतील थकवा पूर्णतः टाळता येणार नाही, पण योग्य आहार, व्यायाम, झोपेच्या सवयी आणि तणावमुक्त दिनक्रमाने तो निश्चितपणे कमी करता येतो. या काळात स्वतःची काळजी घेणं ही बाळाच्या निरोगी विकासाची पहिली पायरी ठरते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Latest Marathi News Live Updates : पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यू

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

SCROLL FOR NEXT