थोडक्यात:
‘सैयारा’ सिनेमात वयाच्या २२व्या वर्षीच वाणीला अल्झायमर झाल्याचे दाखवले आहे, ज्याने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं आहे.
सामान्य समजुतीनुसार अल्झायमर वृद्धांमध्ये होतो, पण हा सिनेमा तरुणांमध्येही त्याची शक्यता दाखवतो.
याबद्दल संशोधन झाले असून काही निष्कर्ष निघाले आहेत.
Early Alzheimer’s Symptoms in 20s: मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेता आहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण त्यातसोबत चर्चा होत आहे ती सिनेमाच्या स्टोरालाइनची. सिनेमात वाणी या पात्राला खूप लवकर विस्मरण सुरू होतं. साध्या गोष्टी, आपण काय बोललो आहोत, दिनचर्या आणि तारीख सुद्धा तिच्या लक्षात राहत नाहीत. तपासणी केल्यानंतर डॉक्टर वाणीला अल्झायमरची सुरुवात झाल्याचं सांगतात.
हे ऐकून अनेक प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण अल्झायमर हा आजार म्हाताऱ्या वयात होतो, असंच आपल्याला ठाऊक असतं. मग एवढ्या लहान वयात असं कसं शक्य आहे?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण पाहूया तज्ज्ञ काय सांगतात. कारण सध्याच्या संशोधनांमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत – ज्या सांगतात की अल्झायमरची सुरुवात आता तरुण वयातसुद्धा होऊ शकते.
ही एक डिमेन्शिया प्रकारातील मेंदूची विकृती आहे, जी हळूहळू स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता कमी करत जाते. सामान्यतः याची लक्षणं ६५ वर्षांनंतर दिसतात, पण आता संशोधनात आढळून आलंय की ही लक्षणं २०-३० वर्षांच्या वयातही दिसू शकतात.
कोलंबिया विद्यापीठाच्या प्राध्यापिका अॅलिसन ऐलो आणि त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनात असं आढळलं की २४ व्या वर्षीच काही विशिष्ट रक्तातील बायोमार्कर्स आणि रिस्क फॅक्टर्सद्वारे अल्झायमरच्या सुरुवातीचे संकेत दिसू शकतात. याचा अर्थ असा नाही की इतक्या लवकर अल्झायमर होतो, पण मेंदूतील हानी सुरू होण्याचा धोका नाकारता येत नाही.
१२,००० तरूणांच्या वैद्यकीय अहवालांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की २४ ते ४४ वयोगटातील अनेकांमध्ये स्मरणशक्ती आणि विचारशक्ती कमकुवत होत होती. या तरूणांच्या मेंदूमध्ये 'टाऊ' नावाचं प्रोटीन आढळलं, जे जास्त प्रमाणात असल्यास मेंदूच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं आणि अल्झायमर होण्याला कारणीभूत ठरू शकतं.
संशोधकांचं म्हणणं आहे की अल्झायमरची प्रक्रिया खूप आधी म्हणजे लक्षणं दिसण्याआधीच मेंदूमध्ये सुरू झालेली असते. आणि लक्षणं समजून येईपर्यंत मेंदूचं नुकसान आधीच झालेलं असतं. म्हणूनच वेळेत लक्ष देणं आणि योग्य जीवनशैली स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. या संशोधनानुसार अल्झायमर आता केवळ वृद्धांचाच नाही राहिला, तो तरूणांमध्ये देखील दिसू लागला आहे.
जर तुम्हाला तरुण वयात खालीलपैकी लक्षणं जाणवत असतील, तर ती अल्झायमरची सुरुवात असण्याची शक्यता असू शकते. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे:
वारंवार गोष्टी विसरणं
लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं
संवाद समजण्यात किंवा संवाद साधण्यात अडथळा
बोलताना योग्य शब्द आठवण्यात अडचण किंवा मध्येच थांबून जाणं
निर्णय घेण्यात गोंधळ किंवा अक्षम्यता
जास्त चिंता, तणाव किंवा चिडचिडेपणा
ओळखीच्या जागांमध्ये रस्ता विसरणं किंवा दिशाभूल होणं
अल्झायमर फक्त वृद्धांनाच होतो का? (Is Alzheimer's disease only seen in elderly people?)
नाही, नव्या संशोधनानुसार अल्झायमरची लक्षणं आता तरुणांमध्येही दिसू लागली आहेत. काही प्रकरणांमध्ये ही लक्षणं २०–३० वयातसुद्धा दिसून येऊ शकतात.
तरुण वयात अल्झायमर होण्याची कारणं काय असू शकतात? (What can cause Alzheimer's at a young age?)
यामागे काही जेनेटिक कारणं, मेंदूतील 'टाऊ' प्रोटीनची वाढ, आणि अपुरी जीवनशैली (झोप, आहार, स्ट्रेस) जबाबदार ठरू शकतात.
अल्झायमरची सुरुवात ओळखण्यासाठी कोणती लक्षणं लक्षात घ्यावी? (What early signs should one watch for in Alzheimer's disease?)
वारंवार विसरणं, लक्ष न लागणं, संवादात अडचण, निर्णय घेण्यात गोंधळ, चिडचिडेपणा आणि ओळखीच्या ठिकाणी रस्ता विसरणं ही काही सुरुवातीची लक्षणं आहेत.
अल्झायमरपासून बचाव करण्यासाठी काय करता येईल? (How can one prevent or delay Alzheimer's disease?)
नियमित व्यायाम, संतुलित आहार, चांगली झोप, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं आणि मेंदू सक्रिय ठेवणाऱ्या सवयी (वाचन, नवं शिकणं) अंगीकारणं उपयोगी ठरू शकतं.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.