laptop harmful uses
laptop harmful uses  sakal
आरोग्य

लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करण्याची सवय आहे? पुरुषांना होऊ शकतो हा त्रास...

दिपाली सुसर

कोविडच्या साथीच्या काळानंतर घरातून ऑफिसचे काम करण्याची संस्कृती खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लॅपटॉपचा वापर वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की लॅपटॉपचा जास्त वापर तुमच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम करू शकतो. दिवसभर लॅपटॉप वापरल्याने तुमच्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतो.

लॅपटॉपमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे आपली त्वचा आणि अंतर्गत ऊतींचे हळुहळु नुकसान होण्यास सुरुवात होते. त्याच्यासोबत बराच वेळ मांडीवर बसून काम केल्यानेही पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते असे तज्ञांचे मत आहे. खरं पाहिल तर लॅपटॉपपेक्षा जास्त नुकसान त्याच्याशी जोडलेल्या वायफायमुळे होते कारण रेडिएशन हे इंटरनेट कनेक्शनशी संबंधित आहे.

आता पाहु या लॅपटॉपला मांडीवर ठेवून त्याचा वापर का करू नये? आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते?

आपल्या मांडीवर लॅपटॉप घेऊन काम करण्याचे अनेक तोटे आहेत .जसे की पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा धोका जास्त असतो.लॅपटॉपच्या उष्णतेमुळे महिलांपेक्षा पुरुषांचे जास्त नुकसान होऊ शकते. याचे कारण म्हणजे शरीराचा पोत. स्त्रियांमध्ये, गर्भाशय शरीराच्या आत स्थित असते, तर पुरुषांमध्ये, अंडकोष शरीराच्या बाहेर स्थित असतो, ज्यामुळे उष्णतेचे किरण जवळ राहतात. त्यामुळे पुरुषांनी लॅपटॉप वापरताना विशेष काळजी घ्यावी.

उच्च तापमानामुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरुल्यामुळे तुम्हाला प्रजननक्षमतेमध्ये समस्या उद्भवू शकतात. वायफायद्वारे रेडिएशन पसरते- लॅपटॉपवर दीर्घकाळ काम करण्यापेक्षा हे वाईट आहे जेव्हा तुम्ही ते स्वतःच्या मांडीवर ठेवून वापरता.

हार्ड ड्राईव्हमधून कमी फ्रिक्वेंसी रेडिएशन उत्सर्जित होते, तर ब्लूटूथ कनेक्शनमधून तेच रेडिएशन बाहेर येते. रेडिएशनच्या प्रभावामुळे तुम्हाला निद्रानाश, तीव्र डोकेदुखी , स्नायू दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे लॅपटॉपचा वापर करतांना तो पायावर किंवा मांडीवर ठेवण्याऐवजी टेबलावर ठेवून त्याचा वापर करा. काही लोक लॅपटॉप वापरताना पाय चिकटवून बसतात, त्यामुळे लॅपटॉपचे रेडिएशन थेट शरीरावर पडतात. उपकरणातून निघणारी उष्णता तुम्हाला आजारी बनवू शकते. आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सतत लॅपटॉप वापरतांना एक तासानंतर पाच मिनिटे ब्रेक घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT