Weight Loss Tips
Weight Loss Tips esakal
आरोग्य

Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन झपाट्याने होईल कमी, करा या टिप्स फॉलो

सकाळ डिजिटल टीम

Weight Loss Tips : हिवाळा म्हटला की त्याबरोबर सुंदर आणि गरम पदार्थ खाण्याची इच्छाही आलीच. हिवाळ्यात जिभेवरचा ताबा सोडायला लावणारे अनेक पदार्थ आपल्याला बाजारात दिसतात, जसे की गाजराचा हलवा किंवा पराठा.

तुम्‍ही वजन कमी करण्‍याचा प्रयत्‍न करत आहात पण हिवाळ्यात हे जरा कठीण वाटत. अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की आपण उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त खातो आणि त्यामुळे वजनही वाढत. अधूनमधून भूक लागणे ठीक आहे, पण ही सवय लावल्याने अजून वजन वाढेल. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण काही उपाय करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.

वजन कमी करणे कधीही सोपे नसते आणि जेव्हा बाहेरचे तापमान झपाट्याने कमी होते तेव्हा ते आणखी आव्हानात्मक ठरते. उन्हाळ्यात फळांच्या आत इतर घटकांबरोबरच पाणी देखील मुबलक प्रमाणत असते; पण हिवाळ्यात हे जरा उलट होते.

तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, या टिप्स फॉलो करा.

१. झोपेच्या 3 तास आधी जेवण करा

केवळ चांगले अन्न आरोग्यासाठी चांगले नाही तर वेळेवर खाणे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचे वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर हिवाळ्यात रात्री झोपण्याच्या 3 तास आधी जेवण करा. लवकर जेवल्याने आपले शरीर त्या अन्नाचे पचनही नीट करू शकते आणि पचनसंस्था सुरळीत राहून तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

२. सकाळी उठल्यापासून २ तासांच्या आत नाश्ता करा

तज्ज्ञांच्या मते, 'सकाळी उठल्यावर नाश्त्याच्या वेळेची विशेष काळजी घेतली पाहिजे. याचे कारण असे की योग्य वेळी केलेला हेल्दी ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभराची उर्जा तर देईलच शिवाय तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल, जे तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करेल. सकाळी उठल्यानंतर दोन तासांच्या आत नाश्ता केला पाहिजे.

३. दररोज व्यायाम करा

उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही नियमित व्यायाम करावा. जर तुम्हाला व्यायामासाठी बाहेर जायचे नसेल, तर घरामध्ये बेसिक वर्कआऊट करा. घरातील कामे जसे की साफसफाई, धुणे, केर लादी, बागकाम आणि इतर कामे केल्याने देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न करण्यास मदत होते. घरून काम करत असतानाही, दर ३० मिनिटांनी तुमच्या जागेवरून उठून तुमच्या घराभोवती थोडे फेरफटका मारा.

४. गोड खावेसे वाटतच असेल तर गुळ खा

मधेच गोड खावेसे वाटत असेल तर घरीच गुळापासून बनवलेले लाडू खा. तसेच दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर मिठाई न खाण्याचा प्रयत्न करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT