Health esakal
आरोग्य

Health : शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी 'या' ४ टिप्स ट्राय करा

आरोग्यसाधना करायची म्हणजे व्यायाम करायचा आणि योग्य तो आहार घ्यायचा हा आपला विचार असतो. हा विचार परिपूर्ण नाही.

सकाळ डिजिटल टीम

Health Tips : आरोग्याचा विचार करताना केवळ शारीरिक व्यायाम आणि आहार याचाच विचार प्राधांन्याने होतो. पण शरीरावर मनाचा आणि मनावर शरीराचा परिणाम होत असतो. त्यामुळे फक्त शारीरिक स्वास्थ्य हे परिपूर्ण स्वास्थ्य नाही. भारतीय तत्वज्ञान, योगशास्त्र आणि आयुर्वेद आपल्याला आरोग्याचे ४ पैलू सांगतात. हे चारही पैलू विचारपूर्वक अभ्यासले तर आपल्याला आरोग्याचा परिपूर्ण विचार करणं म्हणजे काय हे समजेल.

आहार

आहार म्हणजे आपण आपल्या शरीरात घन, द्रव, किंवा वायू रुपात येणारे सर्व घटक. आहारामध्ये जसा आपल्या रोजच्या अन्नाचा समावेश होतो, तसाच आपण आत घेणाऱ्या हवेचा सुद्धा समावेश होतो. त्यामुळे दररोज सात्विक, चौरस आहार जसा महत्वाचा, त्याचप्रमाणे मोकळी हवादेखील महत्त्वाची असते. त्यासाठी

  • मिताहार – आपल्या पोटाचे चार भाग केले तर त्यातील दोन भाग सात्विक घन अन्नाने भरावेत. तिसरा भाग पाण्याने भरावा आणि चौथा भाग रिकामा ठेवावा.

  • हवा – दररोज सकाळी शुद्ध हवा मिळण्यासाठी बाहेर जावं, गच्चीवर जावं, संध्याकाळी किंवा रात्री ओंकार मंत्राचा जप करावा.

विहार

विहार याचा अर्थ रिकाम्या वेळात आपण केलेली कृती. आपल्याला हा रिकामा वेळ असतो का, नसेल तर आपण तो काढण्याचा प्रयत्न करतो का, किंवा तो वेळ नाही याची जाणीव आपल्याला आहे का? मनोरंजनासाठी आपण निवडलेल्या माध्यमांमधून किंवा कृतींमधून आपण मनाला शांत करतो का? हे प्रश्न एकदा स्वतःला विचारावा.

आचार

  • आचार याचा अर्थ आपली वागणूक. आपली वागणूक, तीन प्रकारची.

  • आपण स्वतःशी कसे वागतो. आपण आपले मित्र बनून वागतो की शत्रू बनून.

  • आपण आपल्या प्रेमाच्या माणसांशी कसे वागतो.

  • आपण समाजाशी कसे वागतो. समाजात वागताना आपल्याला हक्कांची आणि जबाबदारीची जाणीव असते का.

विचार

आपले आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण असतं की आपले विचार आणि भावना आपल्याला नियंत्रित करतात याचा बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT