Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : फटाक्यांच्या धुराने श्वासाला त्रास होतोय? 'या' पध्दतीने करा Lungs ची स्वच्छता

धूर थेट फुफ्फूसांमध्ये जाऊन बसतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, खोकला वाढणं असे त्रास होतात.

सकाळ डिजिटल टीम

Foods that clean lungs naturally : दिवाळीला मोठ्या उत्साहात फटाके फोडले जातात. पण त्या नंतर होणाऱ्या प्रदुषणामुळे अनेकांना श्वासाचा त्रास होतो. हा धूर थेट फुफ्फूसांमध्ये जाऊन बसतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, खोकला वाढणं असे त्रास होतात.

जर तुम्हाला पहिल्यापासून श्वसनाचा आजार असेल तर तुम्ही तुमच्या Lungs ची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. दिवाळीचं प्रदुषण तुमच्या Lungs ची जास्त हानी करेल त्या आधीच त्याची स्वच्छता करणं आवश्यक आहे.

काय करावं?

गरम पाण्याची वाफ

श्वसन मार्ग मोकळा करण्यासाठी सगळ्यात प्रभावी आणि सोपा मार्ग म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणं. वाफेने छातीत अडकलेला कफ निघायला पण मदत होते. यामुळे श्वास घेणं सोपं होतं.

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये बरेच अँटीऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे फुफ्फूसांवर आलेली सूज कमी होण्यास मदत होते. यातले तत्व lungs मधल्या टिश्यूंना घातक धूराच्या प्रभावापासून वाचवतात. दिवसातून किमान २ कप ग्रीन टी प्यावा.

अँटी इंफ्लेमेटरी फूड

चेरीसारखं अँटी इंफ्लेमेटरी फूड खाल्ल्याने सूज कमी करण्यासाठी मदत होते. श्वसन नलिकेवर आलेली सूज श्वास घेण्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे ती कमी करण्यासाठी हळद, पालेभाज्या, चेरी, ब्लूबेरी, ऑलिव्ह, अकरोड, सोयाबीन आणि मसूर डाळ यांना अँटी इंफ्लेमेटरी फूड खायला हवं.

एक्सरसाइज करावी

व्यायाम हे केवळ शारीरिक मानसिक आरोग्य जपत नाही तर अनेक आजारांपासून वाचवतंही. यासाठी प्राणायाम उत्तम व्यायाम आहे.

विटामिन डी

विटामिन-डी फूड्स खाल्याने आरोग्य सुधारतं. सॅल्मन, सार्डिन आणि अंडी अशा पशू उत्पादित पदार्थातून व्हिटॅमीन डी मिळतं. फुफ्फूसाचं आरोग्य जपण्यासाठी हे पदार्थ खाणं आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : ही माहिती फक्त सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Hidkal Reservoir Fort : 50 वर्षांनंतर हिडकल जलाशयातून बाहेर आलं मोठं रहस्य; पाणी आटताच समोर आला थरारक इतिहास, 'या' किल्ल्याची स्थापत्यकला पाहून थक्क व्हाल

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : संजय दिना पाटलांच्या मनात पत्रकारांबाबत कुठलाही राग नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

SCROLL FOR NEXT