Onion Juice Benefits
Onion Juice Benefits esakal
आरोग्य

Onion Juice Benefits: भारतात झपाट्याने वाढत असलेल्या ‘या’ आजारावर फायदेशीर आहे कांद्याचा ज्युस!

Pooja Karande-Kadam

Onion Juice Benefits : आपण प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा दवाखान्यात जात नव्हतो. तेव्हा सर्दी पडशाला आई घरीच काढा करून द्यायची. कारण, किरकोर कारणाने दवाखाना गाठांवा अशी परिस्थिती आपली नव्हती.

पण, आईने दिलेल्या काढ्याने लगेचच फरक पडायचा. आताही आपल्याला रोज औषधे खायला सांगणाऱ्या आजारावर किचनमधील अनेक गोष्टी फायदेशीर आहेत.

आता कांद्याचच घ्या ना. तसा त्याचा उपयोग फक्त भाजीला फोडणी घालण्यासाठी होतो. पण, भारतात तरूणांमध्येही झपाट्याने वाढणाऱ्या या आजारावर संशोधकांनी उपाय शोधून काढला आहे.

तो गंभीर आजार आहे मधुमेह. आजकाल करोडो लोक मधुमेहाच्या समस्येशी झुंजत आहेत. हा आजार साथीच्या रोगासारखा पसरला आहे. सर्व वयोगटातील लोक या समस्येचा सामना करत आहेत. मधुमेहामुळे लोकांच्या रक्तातील साखर वाढते. आणि त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम होऊ लागतो.

या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्या-पिण्याची काळजी घेणं गरजेचं आहे. काही घरगुती उपाय देखील मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेली भाजी मधुमेहाचे सर्व काम करू शकते.

या भाजीचे योग्य प्रकारे सेवन करावे. संशोधनात ही बाब समोर आली आहे.ब्रिटिश वेबसाईट एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, एंडोक्राइन सोसायटीची वार्षिक बैठक अमेरिकेतील सॅन डिएगो येथे झाली. यामध्ये काही संशोधकांनी एक संशोधन मांडले. या संशोधनात असे आढळून आले आहे की, कांदा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतो.

कांद्याच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच अंशी कमी करता येते. हे संशोधन करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे की, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय मानला जाऊ शकतो.

किरकोळ किंमतीत उपलब्ध असलेला कांदा चमत्कारिक पद्धतीने तुमची रक्तातील साखर कमी करू शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कांद्याच्या सेवनामुळे दुष्परिणामांचा धोकाही खूप कमी असतो. अशा परिस्थितीत त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, मधुमेहाच्या रुग्णांसाठी कांद्याच्या रसाचे सेवन करावे. कांद्याचा अर्क रोज सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते. संशोधकांनी कांद्याचे वर्णन रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध मार्ग म्हणून केला आहे.

हे संशोधन उंदरांवर करण्यात आले. अभ्यासादरम्यान, मधुमेही उंदरांना दररोज 200, 400 आणि 600 मिलीग्राम कांद्याचा अर्क देण्यात आला. त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते. या उंदरांच्या रक्तातील साखरेमध्ये 35 ते 50 टक्के घट नोंदवली गेली. विशेष म्हणजे उंदरांचे वजन वाढले नाही.

कांदा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने उष्माघातापासून बचाव होतो. कांद्याच्या अर्काचे सेवन केल्याने शरीरात जमा झालेले कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.

कांदा हृदयाचे आरोग्य आणि हाडांची घनता वाढवतो. कांदा खाल्ल्याने लोकांची पचनशक्तीही सुधारते. कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि त्यात अनेक फायदेशीर पोषक घटक असतात.

कांद्यातील महत्त्वाचे घटक

कांद्यामध्ये फोलिकल्स, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं अ, सी, ई मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये फायबरची चांगली मात्रा असते ज्यामुळे अन्न पचन होतं.

तर कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी होते. ज्यामुळे रक्तातील साखर पातळीवरील नियंत्रणात राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT