barley water benefits for weight loss
barley water benefits for weight loss Esakal
आरोग्य

Barley Water: आरोग्यासाठी फायदेशीर आहे 'या' धान्याचं पाणी, वजन आणि कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी ठरेल फायदेशीर

Kirti Wadkar

Weight Loss Tips: भारतामध्ये अशी अनेक पारंपरिक धान्यं Grains आहेत. ज्यांच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. असंच एक अत्यंत पोषक आणि आरोग्यवर्ध धान्य म्हणजे जव. जवला सातू किंवा बार्ली म्हणून ओळखलं जातं.

जव किंवा बार्ली हे शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी Healthy असून बार्लीच्या सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होवू शकतात. Health Tips in Marathi Use of BarlieWater for Weight loss

बार्लीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, झिंक, कॉपर, अमिनो ऍसिड, फायबर, गॅग्नेज, कॅल्शियम Calcium आणि सेलेनियम सारख पोषक तत्व आढळतात. जव किंवा बार्लीच्या पाण्याच्या सेवनामुळे वजन कमी होण्यापासून Weight Loss , कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यास मदत होते. बार्ली वाॅटर barley water मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

भारतात अनेक वर्षांपासून ताप, उष्माघात, तसचं मधुमेह अशा विविध समस्यांवर उपायकारक म्हणून बार्ली वाॅटरचे सेवन केलं जातं. आरोग्यदायी असं हे बार्ली वॉटर कसं तयार करावं आणि त्याचे फायदे याची माहिती आज जाणून घेऊयात

कसं तयार करावं बार्ली वाॅटर

- बार्ली वॉटर घरच्या घरी तयार करण्यासाठी १ कप बार्ली २-३ पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर बार्ली ५-६ तास पाण्यात भिजत ठेवावी.

- त्यानंतर एका पातेल्यामध्ये २-३ ग्लास पाणी घ्याव. यात भिजलेली बार्ली टाकीन गॅसवर पातेलं ठेवावं.

- मध्यम आचेवर जवळपास २०-२५ मिनिटांसाठी बार्ली उकळू द्यावी. त्यानंतर त्यात १ इंच आल्याच्या तुकड्याचे बारिक काप टाकावे.

- पुन्हा २-३ मिनिटं उकळी घ्यावी. हे पाणी गार होवू द्यावं. हे गार झालेलं पाणी तुम्ही गाळून बाटलीत भरून ठेवू शकता.

- त्यानंतर बार्ली वॉटरचं सेवन कऱण्यासाठी एका ग्लासमध्ये १-२ चमचे लिंबाचा रस, चिमूटभर सैंधव मीठ आणि चमचाभर मध टाकावं. यात बार्ली वॉटर टाकून चांगलं मिक्स करावं.

या बार्ली वॉटरचा तुम्ही एखाद्या सरबताप्रमाणे आनंद घेऊ शकता. यामध्ये तुम्ही आवडीनुसार सब्जा किंवा चियासीड्सही टाकू शकता. तसचं थोडा बर्फ टाकून उन्हाळ्यामध्ये या बार्ली वॉटरचं सेवन केल्याने तुमच्या पोटाला थंडावा मिळेल.

हे देखिल वाचा-

बार्ली वॉटरचे फायदे

१. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं- जव किंवा बार्ली वॉटरच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. बार्ली वॉटरच्या सेवनामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. तसचं याच्या नियमित सेवनामुळे High Blood Presure कमी होवून हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

२. शरीर डिटॉक्स करण्यास होते मदत- बार्ली वॉटरमुळे शरीरातील विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स शरीरा बाहेर टाकण्याचं काम सुरळीत होतं. यामुळे किडनीचं कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.

३. वजन कमी करण्यासाठी- बार्ली वॉटरमध्ये कॅलरीजचं प्रमाण अत्यंत कमी असतं तर मोठ्या प्रमाणात फायबर असतात. यामुळे तुमचं पोट भरलेलं राहत. परिणामी पोट जास्त वेळ भरलेलं राहिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

जव किंवा बार्लीच्या पाण्याच्या सेवनामुळे मेटाबॉलिज्म जलद होतं. तसचं कॅलरी बर्न होण्यास मदत होत असल्याने ज्यांना वजन कमी करायचं आहे. त्यांच्यासाठी बार्ली वॉटरचं सेवन फायदेशीर ठरू शकतं.

४. मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर- डायबेटिसच्या रुग्णांसाठी देखील जवच्या पाण्याचं सेवन अत्यंत उपयुक्त आहे. जेवणानंतर एक कप बार्ली वॉटर प्यायल्यास जेवणांनंतर त्वरित वाढणारी ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

५. आतड्यांसाठी उपयुक्त- बार्ली वॉटर सेवनामुळे आतड्यांमध्ये बॅक्टेरियाचं संतुलन राखण्यास मदत होते. चांगलं पचन आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरीचं संतुलन राखण्याचं काम यातील पोषक तत्व करतात.

अशा प्रकारे चांगलं पचन होण्यासाठी तसचं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि मानिसक आरोग्य जपण्यासोबत हार्मोनल बॅलेन्स राखण्यासाठी बार्ली वॉटर उपयुक्त ठरतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT