Health Tips  esakal
आरोग्य

Health Tips : महिलांनो शाकाहारी असाल तर सावधान? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

शाकाहारी महिलांना हिप हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शाकाहार आणि मांसाहार यामध्ये कोणता आहार जास्त चांगला याबाबत सतत चर्चा सुरू असते; पण नेमका कोणता आहार चांगला हे सांगता येणार नाही. कारण प्रत्येक आहाराचे फायदे आणि तोटे आहेत. एका संशोधनानुसार ज्या महिला शाकाहारी आहेत त्यांना हिप हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आज जाणून घेऊयात या संशोधनाबद्दल.

बदलत्या जीवनशैलीनुसार शरीराकडे, त्वचेकडे, शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे सहसा होत नाही. अचानक उद्भवणारे हे आजार आपल्याला माहीतही नसतात. आणि त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, हेच दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कमरेच्या हाडांना होणारा त्रासाला हिप बोन म्हणतात. वयाचा ठराविक टप्पा ओलांडल्यावर महिलांची हाडे कमकुवत होऊ लागतात. ज्याचा सर्वात जास्त परिणाम हिप बोनवर होतो.

एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे, की ज्या महिला शाकाहारी आहेत त्यांना हिप हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते. आज 1 ऑक्टोबर रोजी जागतिक शाकाहारी दिवस साजरा झाला. त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला हिप फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते सांगत आहोत. वयाची ३५ ते ४० वर्षे ओलांडल्यावर प्रत्येक स्त्रीला आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हाडांची ताकद कमी होणे हा देखील असाच एक बदल आहे. हाडे कमकुवत होणे. हाडांच्या घनतेच्या घटनेचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. यासंदर्भात केलेल्या एका संशोधनात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

बीएमसी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लीड्स विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनानुसार, ज्या महिला फक्त शाकाहारी आहार घेतात. म्हणजेच त्या महिलांना हिप बोन फ्रॅक्चरचा धोका जास्त असतो. हिप बोन फ्रॅक्चर म्हणजे हिप हाड मोडणे. या संशोधनात 35 ते 69 वयोगटातील महिलांचा समावेश करण्यात आला होता. एकूण 26 हजार महिलांचा यात अभ्यास करण्यात आला. १२ वर्षाच्या काळातील संशोधनानुसार, शाकाहारी महिलांमध्ये मांसाहार खाणाऱ्या महिलांपेक्षा हिप फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते.

ज्या महिलांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी12, ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस्, फॉस्फरस आणि झिंकची कमतरता होती त्यांच्यामध्ये हिप बोनचा धोका जास्त होता. तसे, हे सर्व घटक वनस्पतींच्या आहारातून मिळू शकतात. दुग्धजन्य पदार्थ देखील या पोषक तत्वांची भरपाई करू शकतात. असे असूनही शाकाहारी महिलांमध्ये या घटकांची कमतरता होती. या संशोधनातील संशोधक जेम्स वेबस्टर यांच्या मते, शाकाहारी लोकांचा बीएमआय सरासरी कमी असतो. एखाद्या व्यक्तीचा बीएमआय कमी-जास्त असला तरी त्याचा परिणाम हाडे आणि स्नायूंवर होतो. त्याचा परिणाम हिप बोनवर देखील होतो.

तसेच हाडावरही दिसून येतो. ज्यांच्या फ्रॅक्चरची शक्यता वाढते. ह्या टिप्स टाळतील धोका हिप बोन फ्रॅक्चर टाळण्यासाठी शाकाहारी लोकांनी मांसाहार केला पाहिजे असे काही नाही. शाकाहारी व्यक्ती जे काही खातील त्यातून पोषक घटक मिळतील याची काळजी घ्यायला हवी. धूम्रपान आणि दारूच्या व्यसनामुळेही हाडांचा त्रास सुरू होतो. ज्या लोकांना हाडे दुखण्याचा त्रास होतो त्यांनी या दोन्ही सवयी टाळल्या पाहिजेत. हाडे मजबूत करण्यासाठी व्यायाम करणे फायद्याचे ठरते. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी प्रथिने आणि पोषण घटक अधिक असलेला आहार घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT