Mood Swing Sakal
आरोग्य

Mood Swing : तुमचाही मूड होतोय वारंवार स्विंग? करा हे उपाय

वारंवार मूड स्विंग होण्याच्या समस्येमुळे याचा परिणाम तुम्ही करत असलेल्या कामावरही होतो.

सकाळ डिजिटल टीम

Why Mood Swings Happen : जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होतो, त्याला मूड स्विंग्स होणे असे म्हणतात. अनेक जणांमध्ये वारंवार मूड स्विंग होण्याची समस्या असते. वारंवार मूड स्विंग होण्याच्या समस्येमुळे याचा परिणाम तुम्ही करत असलेल्या कामावरही होतो.

depression

ज्यावेळी मूड स्विंग होतो त्यावेळी शरीरात उर्जेची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे व्यक्ती त्रासलेली दिसून येते. यामुळे संबंधित व्यक्तीच्या वागण्यात चिडचिडेपणा, कमी-अधिक प्रमाणात भूक, झोप न लागणे आदी लक्षणं दिसून येतात. जर, तुम्हीदेखील वारंवार मूड स्विंग होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर, येथे दिलेल्या काही उपायांचा तुम्ही अवलंब करून आरम मिळवू शकता. असे केल्याने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा

मूड स्विंगच्या समस्येवर मात करण्यासाठी ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. कारण त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. याशिवाय जेवणात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवा. व्हिटॅमिन सी मूड स्विंग किंवा तणाव कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हालादेखील मूड स्विंगचा त्रास होत असेल तर, आहारात फायबरयुक्त पदार्थांचा अवश्य समावेश करा.

Relationship

दीर्घ श्वास घ्या

दीर्घ श्वासोच्छवासाच्या मदतीने मूड स्विंगची समस्या टाळता येते. हे करण्यासाठी, शांत ठिकाणी ध्यानाच्या मुद्रेत बसा. त्यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि हळू हळू सोडा. असे 10 वेळा करा. ही क्रिया दररोज केल्यास मूड स्विंगच्या समस्येवर मात करणे शक्य आहे.

Drinking Water

भरपूर पाणी प्या

अधि प्रमाणात पाणी प्यायल्यानेदेखील वारंवार होणारी मूड स्विंगच्या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यामुळे दररोज पुरेसे पाणी शरिरात जाऊ द्या. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. तसेच यामुळे वारंवार मूड बदलू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT