Back Pain Exercise Sakal
आरोग्य

ऑफ‍िसमध्ये तास-न्-तास बसून काम केल्यानं दुखतेय पाठ? आराम मिळवण्यासाठी करा हे 2 व्यायाम

पाठदुखीच्या समस्येतून आराम मिळवण्यासाठी घरच्या घरी दोन सोप्या व्यायामांचा नक्की सराव करून पाहा. आरोग्यास मिळतील अगणित लाभ.

Harshada Shirsekar

Back Pain Exercises : पाठदुखीची समस्या उद्भवल्यास कोणत्याच कामात मन रमणं कठीणच. जी मंडळी ऑफिसमध्ये पूर्ण दिवस एकाच जागेवर बसून तास-न्-तास काम करतात, त्यांच्यामध्ये पाठदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. संपूर्ण दिवस एकाच ठिकाणी बसून काम केल्यानं पाठीच्या कण्यावर ताण येतो. 

स्नायूंच्या पुरेशा प्रमाणात हालचाल न झाल्याने शारीरिक वेदना होऊ लागतात. हे दुखणे कमी करण्यासाठी कित्येक जण बाजारातील पेन किलर, पेनकिलर स्प्रे, बाम यासारख्या औषधोपचारांचा वापर करतात. पण या पर्यायांमुळे शरीराच्या दुखण्यातून केवळ तात्पुरती मुक्तता होऊ शकते.

पाठीच्या दुखण्यातून कायमस्वरुपी सुटका हवी असल्यास नियमित केवळ या दोन व्यायामांचा सराव करून पाहा आणि स्वतःच अनुभवा फायदे. 

बालासन (Child Pose)

बालासनाचा अभ्यास केल्याने शारीरिक ताणतणाव आणि थकव्यातून सुटका होण्यास मदत मिळते. बालासनाच्या सरावामुळे नितंब, खांदे, मांड्या आणि पाठीच्या स्नायूंना आराम मिळतो.  

कसा करावा सराव?

  • सर्वप्रथम वज्रासनामध्ये बसा आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा.

  • हळूहळू आपले हात पायावरून जमिनीवर सरकवा आणि पुढे न्या. 

  • दोन्ही हात पुढे नेत आपल्या कपाळाने जमिनीला स्पर्श करावा. 

  • ही झाली बालासनाची अंतिम स्थिती.

  • आपल्या क्षमतेनुसार बालासनाच्या अंतिम स्थितीत राहावे. 

ट्रायसेप स्‍ट्रेच (Triceps Stretch)

ट्रायसेप स्ट्रेचमुळे खांदे, मान आणि पाठीच्या वरील भागामध्ये होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळते. या व्यायामामुळे शरीराचे स्नायू मजबूत देखील होतात. 

कसा करावा व्यायाम ?

  • आपण बसून तसेच उभे राहूनही हा व्यायाम करू शकता.

  • डावा हात मागील बाजूस घेऊन जा आणि उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर खालील बाजूस स्ट्रेच करावे. 

  • यानंतर उजवा हात मागील बाजूस घेऊन जा आणि डाव्या हाताने उजव्या हाताचे कोपर खालील बाजूस स्ट्रेच करावे.  

  • हा व्यायाम करताना हात चुकीच्या पद्धतीने स्ट्रेच करण्याची चूक करू नये.  

  • पाच - पाच सेट केल्यानंतर शरीर रिलॅक्स करावे. 

नियमित हे दोन्ही व्यायाम केल्यास शरीराचे स्नायू लवचिक व मजबूत देखील होतील.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT