Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : वजन कमी करण्यासाठी गरम पाणी किती प्यावे? जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी गरम किंवा कोमट पाणी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. पण यात किती सत्य आहे? किती पाणी प्यायला हवे?

सकाळ डिजिटल टीम

Hot Water For Weight loss : वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. धवपळ, बदलती जीवनशैली, अपूरी झोप, अवेळी खाणे अशा बऱ्याच कारणांनी वजन वाढते. मग ते कमी करण्यासाठी डाएट, व्यायाम, योगासने असे बरेच उपाय केले जातात. बरेच जण वजन कमी करण्यासाठी सकाळी उठून गरम पाणी पितात. मात्र खरंच गरम पाणी (Warm Water) प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत पाण्याचा एक मोठा भाग असतो, मात्र ते नेमकं कसं होतं , रोज किती पाणी प्यावे, या सर्वांबद्दल माहिती जाणून घेऊया.

गरम पाणी पिल्याने वजन कमी होते का ?

गरम पाणी पिण्याचे शरीराच्या वजनावर सरळ प्रभाव पडत नाही. याचे जसे काही फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास शरिरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत मिळते. तसेच जेवल्यानंतर गरम पाणी अथवा कोमट पाणी प्यायल्यास अन्नपचनास मदत मिळते. मात्र त्यामुळे शरीराच्या वजनावर सरळ प्रभाव पडत नाही.

मात्र, एका ठराविक प्रमाणात पाणी प्यायल्यास वजनावर परिणाम होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पित असाल तर तुमचे वजन कमी होऊ शकते. त्याशिवाय, जेवण्याआधी काही वेळ अर्धा लिटर पाणी प्यायल्यास मेटाबॉलिज्मही वाढते. दिवसभर थोड्या -थोड्या वेळाने गरम पाणी पीत राहिल्यास मेटाबॉलिज्म सुधारते, फॅट ब्रेक करण्यासाठी गरम पाण्याची मदत होते. त्यामुळे पचनही चांगल्या पद्धतीने होते आणि पाणी पीत राहिल्याने सारखी-सारखी भूकही लागत नाही.

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यासहित इतर पर्याय

  • तुम्ही सकाळी हर्बल टी पिऊ शकता. हर्बल टी, वजन कमी करण्याचे काम करते आणि त्यामुळे शरीरही डिटॉक्स होते.

  • दिवसभरात कोणतेही जेवण टाळू नका. सकाळी भरपूर उर्जा देईल असा नाश्ता करावा.

  • भरपूर प्रमाणात फळं आणि सुका-मेवा खात रहा.

  • व्यायाम करावा. त्याने फॅट कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT