How Men's Sperm Affects Baby's Health men's sexual health  
आरोग्य

Men's Health : पुरुषांनो 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा बाळाचे आरोग्य येईल धोक्यात

पुरुषांच्या शुक्राणूच्या गुणवत्तेचा न जन्मलेल्या बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो कारण शुक्राणू गर्भामध्ये आणि भविष्यात बाळामधील अनुवांशिक दोषास कारणीभूत ठरतात.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पुरुषांच्या शुक्राणूच्या गुणवत्तेचा न जन्मलेल्या बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो कारण शुक्राणू गर्भामध्ये आणि भविष्यात बाळामधील अनुवांशिक दोषास कारणीभूत ठरतात. ज्यामुळे बाळाला विविध आरोग्य समस्या येऊ शकतात.

पुरुषांना शुक्राणूंची संख्या किंवा शुक्राणूंच्या आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. पुरुषाच्या पुनरुत्पादक आरोग्यावर काही कारणांमुळे परिणाम होऊ शकतो आणि त्यातील काही जन्मजात विकृती असू शकतात. (How Men's Sperm Affects Baby's Health men's sexual health)

अशा प्रकारे पुरुषांच्या शुक्राणूंच्या आरोग्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याबद्दल सांगत आहेत नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या प्रजनन सल्लागार डॉ निशा पानसरे. हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या समस्येची कारणे पुढीलप्रमाणे

अनारोग्यदायी आहाराचे सेवन : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि उच्च कोलेस्टेरॉल यांचा समावेश होतो. या समस्या पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात.

तंबाखू : धूम्रपानामध्ये हानिकारक रसायने असतात जी माणसाच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात. ते उपस्थित शुक्राणूंची संख्या तसेच त्यांची गतिशीलता आणि स्वरूपावर परिणाम करतात. शुक्राणूंची संख्या ही अंड्याचे फलित करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात.

धुम्रपानामुळे गुणसुत्रांमध्येही दोष येऊ शकतो. गर्भाची गुणवत्ता खराब होते आणि प्रजनन दर कमी होतो. कुटुंब नियोजनाकरिता पुरुषांनी धूम्रपान सोडले पाहिजे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे.

अल्कोहोल : प्रजनन प्रणालीशी जोडलेल्या ग्रंथींवर प्रभाव टाकून लैंगिक संप्रेरकांवर प्रभाव पडतो. ज्या पुरुषांनी मुले जन्माला घालण्याची योजना आखली आहे त्यांनी दारू सोडली पाहिजे.

बैठी जीवनशैली : खाण्याच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव, अपुरी झोप, जास्त वेळ बसणे, तणाव आणि लठ्ठपणा यांचाही शुक्राणूंवर परिणाम होतो. निरोगी जीवन जगण्यासाठी पुरुषांनी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

घट्ट जीन्स घालणे टाळा : जे पुरुष घट्ट जीन्स/अंडरवेअर घालतात त्यांना मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय) होऊ शकतो ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते आणि मांडीच्या भागात बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो ज्यामुळे अंडकोषांचे तापमान वाढते.

वेळीच निदान व उपचार करा : आरोग्यविषयक समस्यांवर मात करणे गरजेचे आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल यांसारखी आरोग्य स्थिती असलेल्या पुरुषांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कोणतीही गुंतागुंत होण्यापूर्वी या परिस्थितींचे व्यवस्थापन केले पाहिजे. गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी जोडप्याने प्रजनन सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT