Drinking water tips esakal
आरोग्य

Health: शरीरातील Toxins घालवण्यासाठी एक तासात किती पाणी प्यावे? एक्सपर्ट सांगतात फॉर्मूला

तासानुसार पाणी पिण्याचे प्रमाण तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कायम निरोगी राहाल

सकाळ डिजिटल टीम

Drinking water tips: तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया आणि टॉक्झिन्स घालवण्यासाठी भरपूर पाणी पिणे फार आवश्यक असते. पाण्याला सगळ्यात जास्त हेल्दी ड्रिंक मानल्या जाते. त्यामुळे दररोज निरोगी राहाण्यासाठी पाणी पिणे गरजेचे ठरते. तसेच शरीराला आतून स्वच्छ ठेवण्यासाठीही पाणी पिणे आवश्यक ठरते. मात्र अनेकजण तासंतास पाणी पित नाहीत. कमी किंवा अतिप्रमाणात पाणी पिण्याचेही घातक परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे नेमकं तासाभऱ्यात किती पाणी प्यायचं ते जाणून घ्या.

सगळ्यात आधी आपण मर्यादित पाणी पिण्याचे फायदे आणि कमी पाणी पिण्याचे तोटे जाणून घेऊया

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मते, पाणी शरीरात अनेक प्रकारचे फंक्शन करतो. जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे

पाणी शरीरातील सेल्स पर्यंत पोषत तत्व आणि ऑक्सिजन पोहोचवतं.

पाणी ब्लॅडरमधून टॉक्झिन्स बाहेर काढतं.

पचनशक्ती वाढवण्यास पाण्याची मदत होते.

कफपासून तुमचा बचाव करते.

बीपी लेवल कंट्रोलमध्ये ठेवतं.

शरीराचं तापमान सामान्य ठेवण्यास मदत करतं.

तसेच शरीरात इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण नियंत्रित ठेवतं.

Drinking Water Benefits

कमी पिल्यास होतात तोटे

कमी पाणी पिल्याने डिहायड्रेशन होतं. ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी, चक्कर येणे, विकनेस, तोंड कोरडे करणे, कोरडा खोकला, लो ब्लड प्रेशर, पाय सुजने, मसल्स क्रँप यांसारख्या समस्या उद्भवतात.

१ तासात किती पाणी प्यावे?

तासाभऱ्यात तुम्ही किती पाणी प्यावे ते तुमच्या वयावर, फिजीकल अॅक्टिव्हिटी, लिंग, तापमान आणि बॉडी वेटवर आधारित असतं. एक्सपर्ट्स दर तासाने दोन ते तीन कप पाणी पिण्यास सांगतात. जर हवामान गरम असेल किंवा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर याचं प्रमाण वाढू शकतं. एका हेल्दी व्यक्तीस एका दिवसात २-३ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या बॉडीची वॉटर लेव्हल काय आहे ते डॉक्टरांकडून जाणून घ्या.

शरीरात पाण्याची लेव्हल बॅलेंस ठेवण्यासाठी तुम्ही या गोष्टी टाळायला हव्यात

पाण्याची तहान भागवण्यासाठी चुकूनही शुगरी कार्बोनेट ड्रिंक्स पिऊ नका. तसेच मद्यासह कॅफिनचं सेवन करू नका. त्यामुळे शरीरातील पाण्याची लेव्हल कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT