Happy Life  sakal
आरोग्य

Happy Life : कामाचं टेन्शन, आर्थिक ताण... अशा स्थितीत स्वत:ला आनंदी कसं ठेवाल ?

आनंद झाल्यावर मोकळेपणाने हसा. कोणाला भेटल्यावरही चेहऱ्यावर स्मितहास्य असू द्या. आनंदी चेहरा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देतो.

नमिता धुरी

मुंबई : घरातील भांडण-तंटे, घराबाहेरची गर्दी, अभ्यासाची चिंता, ऑफीसमधल्या कामाची चिंता, मनाविरूद्ध होणाऱ्या गोष्टी, आर्थिक अडचणी, अशी एक ना अनेक कारणे आहेत आपल्याकडे दु:खी राहण्यासाठी.

अशा स्थितीत काही चांगल्या गोष्टी घडल्याच तरी त्याचा पूर्ण आनंद घेता येत नाही. इतरांचं हसतं-खेळतं आयुष्य पाहून प्रश्न पडतो 'आनंदी राहायचं तरी कसं ?' या प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेऊ. हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

  • रोज शारीरिक व्यायाम करा. यामुळे तुमचे शरीर सुदृढ राहील व तुम्हाला दु:खी करणारी आजारपणे उद्भवणार नाहीत. त्यासोबतच ध्यानधारणा करा जेणेकरून तुमचे विचार नियंत्रित होतील व मन शांत राहील.

  • आनंद झाल्यावर मोकळेपणाने हसा. कोणाला भेटल्यावरही चेहऱ्यावर स्मितहास्य असू द्या. आनंदी चेहरा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देतो.

  • पुरेशी झोप घ्या. प्रौढ व्यक्तिला किमान ७ तासांची झोप आवश्यक असते.

  • हिरव्या भाज्या, फळे आणि कडधान्ये यांचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश केल्यास शरीराला भरपूर पोषक तत्त्वे मिळतील जेणेकरून तुम्हाला आनंदी ठेवणारी संप्रेरके नियंत्रणात राहतील.

  • रोज प्राणायम करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. पूर्ण श्वास घ्या आणि पूर्ण श्वास बाहेर सोडा.

  • तुमचा आनंद हिरावून घेणाऱ्या प्रसंगांकडे सकारात्मक दृष्टीने बघा. त्यामागील कारणे शोधा आणि पुन्हा ती गोष्ट घडणार नाही याची काळजी घ्या.

  • दिवसातून थोडं तरी वाचन करण्याची सवय स्वत:ला लावून घ्या. वाचनामुळे तुमची एकाग्रता वाढेल. विचार स्पष्ट होतील. शब्दसंपदा वाढेल. यामुळे तुम्ही तुमची बाजू, मतं इतरांना चांगल्या प्रकारे पटवून देऊ शकाल. परिणामी अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतील.

  • महिन्यातून एकदा तरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा. यामुळे मन प्रसन्न राहील आणि इतरांशी मैत्रीही होईल.

  • हे सगळं एकाएकी जमणार नाही. त्यासाठी सोपी आणि अल्पकालीन ध्येये निश्चित करा. उदा. एखादं पुस्तक धडाधडा वाचत सुटू नका. रोज एक किंवा दोनच पानांचं ध्येय निश्चित करा. हळूहळू वाचन वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT