Monsoon Health Care Sakal
आरोग्य

Monsoon Health Care : पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीये? मग आहारात घ्या 'हे' महत्त्वाचे पदार्थ!

Immunity Booster Food पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये काही ठराविक पदार्थांचा समावेश करावा. महत्त्वाचे म्हणजे हे पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सहजासहजी आढळतात.

सकाळ डिजिटल टीम

- दिनराज मोहिनी आपोणकर, आहारतज्ज्ञ

बहुतेक लोक पावसाळ्यात गरमागरम चहासोबत भजी खात पावसाळ्याचा आनंद घेतात. याशिवाय बऱ्याच जणांना पावसाळ्यात वडापाव, भजी, मोमोज, चायनीज यासारखे गाडीवर मिळणारे पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. अशावेळी या सगळ्या आनंदावर एक गोष्ट पाणी फिरवू शकते, आणि ती म्हणजे कमजोर रोगप्रतिकारक शक्ती.

तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर तुम्हाला वायरल फीवर, जुलाब, मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू इत्यादी रोगांना सामोरे जावे लागू शकते. पण घाबरू नका, या रोगांशी लढण्यासाठीचे स्वस्त आणि सोपे पर्याय आपल्या किचनमध्ये उपलब्ध आहेत.

लिंबूवर्गीय फळे

पावसाळ्यात बरेच जण आंबट आणि लिंबूवर्गीय फळे खाणे टाळतात. पण रोजच्या आहारात द्राक्षे, लिंबू, पेरू, संत्री इत्यादी फळांचा समावेश केल्यास विटामिन सी मुबलक प्रमाणात मिळून रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.

आले आणि लसूण

आले आणि लसूणामध्ये प्रतिजैविक तसेच अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असल्यामुळे, पावसाळ्यामध्ये हे दोन पदार्थ आपल्याला घसादुखी तसेच थंडी तापापासून संरक्षण देऊ शकतात. रोजच्या चहामध्ये किंवा सूपमध्ये आल्याचा वापर केल्यास पदार्थाची चव वाढण्यासोबत रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढायला मदत होते.

सूर्यफुलाच्या बिया

लहानपणी शाळेबाहेरच्या दुकानात मिळणाऱ्या भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया तुमची रोगप्रतिकारक शक्ती कैक पटीने वाढवू शकतात. सुर्यफुलाच्या बियांमध्ये धोकादायक जिवाणूंशी लढण्यासाठी लागणारे मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम, फॉस्फरस आणि विटामिन ई यासारखे महत्त्वाचे घटक असतात.

रोजच्या आहारात सूर्यफुलाच्या बियांखेरीज भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बिया इत्यादी बियांचा समावेश केल्यास पावसाळ्यात तुम्ही तुमचे आरोग्य चांगल्या पद्धतीने राखू शकता. 

दही

पावसाळा आल्यावर बऱ्याच घरांमध्ये दही खाणे टाळले जाते. यामुळे दह्यामध्ये असणारे, हानिकारक जिवाणूंशी लढा देणारे चांगले जिवाणू शरीराला मिळत नाही. अशावेळी हानिकारक जिवाणूंनी आक्रमण केल्यावर शरीर त्यांच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवू शकत नाही.

याशिवाय पावसाळ्यात सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने शरीराला विटामिन डीची देखील आवश्यकता असते. अशावेळी दही आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी फायद्याचे ठरते. वर सांगितलेल्या पदार्थांशिवाय मासे, अंडी, मांस, हिरव्या पालेभाज्या, आणि ऑईस्टर या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता.

त्याशिवाय पाणी उकळून घेणे, मांस आणि मासे चांगल्या प्रकारे धुवून घेणे यासारख्या सोप्या उपायांनी तुम्ही रोगांना तुमच्यापासून दूर ठेवू शकता., आणि पावसाचा अधिक चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकता.

(लेखक आहारतज्ज्ञ आणि जैवतंत्रज्ज्ञ असून मातापोषण व बालकांची वाढ या विषयावर संशोधन करत आहेत.) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT