Miscarriage esakal
आरोग्य

Miscarriage: गर्भपातानंतर महिलांना होतात 'हे' त्रास...असुरक्षित संबंधांमुळे...

नव्या पिढीतील तरूणांमध्ये असुरक्षित संबंधांमुळे गर्भपाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते

सकाळ डिजिटल टीम

Women Health: अलीकडे लग्नाआधीच लैंगिक संबंध ही फार साहाजिक गोष्ट झाली आहे. ७०-८० टक्के तरूणाई लग्नाआधीच लैंगिक संबंधांना सामोरे गेली असते. अशा वेळी अनवाँटेड प्रेग्नंसी फार कॉमन झाली आहे. कमी वयातील मुली अशा चुका केल्यानंतर ऑप्शन नाही म्हणून गर्भपाताचा पर्याय निवडतात. मात्र गर्भपातानंतर त्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते याची कल्पनाही त्यांना नसते.

सर्वोच्च न्यायालयाने महिलांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा अधिकार दिला आहे. त्यामुळे २४ आठवड्यापर्यंत अविवाहित महिलाही गर्भपात करू शकतात. मात्र महिलांना ही सवलत मिळाली असली तरी आरोग्याचं मात्र नुकसान होतं. गर्भपातानंतर तुमची काळजी तुम्हीच घ्यायची असते.

महिला करतात 'या' चुका

अविवाहित आणि विवाहित जोडप्यांमध्ये इमर्जन्सी पिल म्हणजे असुरक्षित संभोगानंतर फक्त तोंडात टाकायची एक गोळी घेतली की सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व होतात असा अनेकांचा गैरसमज असतो. पण त्याचे परिणाम नंतर महिलांना भोगावे लागतात. अनियमित पाळी आणि बरेच आरोग्याचे त्रास स्त्रियांना भोगावे लागतात. महिलांच्या प्रजनन संस्थेवरही त्याचा परिणाम होतो.

अनेक महिला गर्भपाताच्या गोळ्या घेतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या अजिबात घेऊ नये. असे करत असाल तर तुम्ही तुमच्या जीवाशी खेळताय. चुकीच्या डोजमध्ये गोळ्या घेतल्याने अर्धवट गर्भपात होतो. आणि रक्तस्त्राव होतो. अशा पेशंटमध्ये जंतुसंसर्गाचाही धोका फार जास्त असतो. जंतुसंसर्ग झाल्यास अशा पेशंट्सला व्यंधत्व येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खासदारकीसाठी TMC बंडखोरांनी निवडला त्रिपुरातला लहान पक्ष, फक्त नावाला अस्तित्वात; दोन वर्षांपूर्वी NCPIची स्थापना

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Pune Ring Road: पुणे परिसरातील ११७ गावांसाठी मोठी बातमी! सरकारच्या निर्णयामुळे विकासाचा मार्ग मोकळा, रिंगरोडलाही मिळणार वेग

Nagpur: मांजर चावल्यानं तक्रारीला उशीर, विनयभंगाचा गुन्हा कोर्टानं केला रद्द; शाळेच्या अध्यक्षाला दिलासा

Ratnagiri Rain Update : कोकण किनारपट्टीवर कडकडीत ऊन! मुंबई वेधशाळेचा पुढील 3 दिवसांचा 'हा' अंदाज वाचून शेतकऱ्यांची धडधड वाढली, 2 हजार हेक्टरवरील पेरण्या संकटात

SCROLL FOR NEXT