A healthcare professional explaining early detection and symptoms of breast cancer in men.

 

esakal

आरोग्य

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

Male breast cancer signs :लक्षणांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका ; जाणून घ्या, याबाबत आरोग्य तज्ज्ञांचे काय मत आहे?

Mayur Ratnaparkhe

Common Symptoms of Breast Cancer in Men : डॉक्टरांच्या मते  स्तनाचा कर्करोग हा केवळ महिलांचा आजार नाही. प्रत्येक मनुष्य थोड्या प्रमाणात स्तनाच्या ऊतींसह जन्माला येतो आणि ही ऊती कधीकधी असामान्यपणे वाढू शकते. मेयो क्लिनिकच्या मते, पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग सामान्यतः स्तनाच्या ऊतींमधील पेशींमध्ये बदल झाल्यामुळे सुरू होतो. या कर्करोगाच्या पेशी हळूहळू वाढतात आणि कालांतराने, गाठ किंवा ट्यूमर तयार करतात.

आरोग्य तज्ञांच्या मते हा आजार साठीनंतच्या वयोगटातील पुरुषांमध्ये सर्वाधिक दिसून येतो, परंतु तो कोणत्याही वयात होऊ शकतो. सीडीसी आणि मेयो क्लिनिकच्या मते, काही घटक स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढवतात. यामध्ये वाढतं वयातील  हार्मोनल असंतुलन किंवा इस्ट्रोजेन थेरपी, स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, ज्यामध्ये पुरुषांमध्ये एक्स क्रोमोसोमची अतिरिक्त प्रत असते, यकृताचे आजार जसे की सिरोसिस, लठ्ठपणा, ज्यामुळे शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते.

अमेरिकेतील ग्राउंड झिरो येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. न्यू यॉर्क पोस्टमधील एका अहवालानुसार, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने आतापर्यंत ९१ पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची पुष्टी केली आहे.

 हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही आकडेवारी २०२४ सालाची आहे. मात्र ही संख्या २०१८ मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा सहा पट जास्त आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा ९० पट जास्त आहे. तर तज्ञांचे म्हणणे आहे की हे चिंताजनक आहे कारण पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सामान्यतः अत्यंत दुर्मिळ मानला जातो. साधारणपणे, दर १००००० पैकी फक्त एक पुरूष या आजाराने ग्रस्त असतो.

कोणत्या पुरुषांना धोका आणि लक्षणे? -

 तज्ञांच्या मते  पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे बहुतेकदा सौम्य असतात आणि बहुतेकदा दुर्लक्षित केली जातात. काही सामान्य लक्षणांमध्ये वेदनारहित गाठ किंवा छातीवर सूज येणे, त्वचा आकुंचन पावणे, लालसरपणा किंवा रंग बदलणे, स्तनाग्राच्या आकारात किंवा आतील बाजूस वळणे, स्तनाग्रातून द्रव किंवा रक्त गळणे आणि काखेतून किंवा कॉलरबोनभोवती सूज येणे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन कोटींची लाच मागणाऱ्या PSIच्या घरात ५६ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने अन् मालमत्तेची कागदपत्रे; झडतीत काय सापडलं?

MP Udayanraje Bhosale: लोकांवर अन्याय झाल्यावर आवाज उठवतोच: खासदार उदयनराजे: साताऱ्यातील मनोमिलनाेबाबत केलं माेठे विधान..

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा न तळता आख्या हिरव्या मुगाचे वडे, लगेच लिहून घ्या रेसिपी

Sushma Andhare: फलटण महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍याप्रकरणी चौकशीसाठी उच्‍चस्‍तरीय समिती नेमा: सुषमा अंधारे आक्रमक; पोलिस ठाण्‍यासमोर ठिय्‍या..

SCROLL FOR NEXT