How to Eat Cucumber Esakal
आरोग्य

How to Eat Cucumber: कधीही काकडी खाल तर वाढतील अडचणी, कधी आणि कसं करावं काकडीचं सेवन

How to Eat Cucumber: काकडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे असले तरी अयोग्य वेळी काकडीचं सेवन करणं आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं

Kirti Wadkar

उन्हाळा सुरु झाला की आपल्या आहाराच काकडीचा हमखास समावेश केला जातो. जेवणासोबतच नव्हे तर दिवसभरात कधीही गारेगार काकडी खाणं अनेकजण पसंत करतात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडीचं सेवन शरीरासाठी फायद्याचंही ठरतं. शरिरासाठी आवश्यक असणारे मायक्रो न्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडनट काकडीमधून मिळतात. Marathi Health Tips Which time good to eat cucumber

त्याचसोबत यात पाण्याचं भरपूर प्रमाण असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते. तसचं काकडीमध्ये Cucumber विटामिन सी, विटामिन के, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलिरा यांसारखी अनेक पोषक द्रव्य उपलब्ध असतात.

त्वचा, केस तसचं वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेही रुग्णांसाठी Diabetic Patients काकडीचे अनेक फायदे आहेत. Cucumber health benefits तसचं रोगप्रतिकारह शक्ती वाढण्यासही काकडी गुणकारी आहे. 

काकडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे असले तरी अयोग्य वेळी काकडीचं सेवन करणं आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. आयुर्वेदाप्रमाणे कफदोष असलेल्या व्यक्तींनी थंड गुणधर्म असलेले पदार्थ खाताना वेळेचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.

कफदोष असलेल्या व्यक्तींना सर्दी, खोकला तसंच फुफ्फुसासंबधीत समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच काकडी खाण्यासाठी योग्य वेळ कोणती? काकडी खाताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? हे जाणून घेऊयात. Right time to eat cucumber 

रात्री काकडी खाण्याचे तोटे- रात्री काकडी खाल्ल्याने कफदोषाची समस्या वाढण्याची शक्यता असते. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं. तसचं काकडी प्रवृत्तीने थंड आहे. त्यामुळेच रात्री काकडीचं सेवन केल्याने फुफ्फुसातील म्युकस म्हणजेच श्लेम वाढण्याची शक्यता बळावते. यामुळे सर्दी खोकला होवू शकतो. त्यामुळे रात्री काकडीचं सेवन टाळा. Eating cucumber at night 

कफदोष वाढण्याची शक्यता- रात्री काकडी खाल्ल्याने तुमच्या आतड्यांच्या हालचालीवर परिणाम होवून तुम्हाला रात्री वारंवार लघवीला जावं लागू शकतं. यामुळे झोपवर परिणाम होवू शकतो. तसंच रात्रभर शरीराला थंडावा मिळाल्याने कफदोषाचं नियंत्रण बिघडू शकतं. यामुळे जर एखाद्याला इस्नोफीलियाचा त्रास असेल तर तो आणखी वाढण्याचा धोका असतो. Cucumber side effects

हे देखिल वाचा-

काकडी खाण्याची योग्य वेळ- दिवसाची वेळ ही काकडी खाण्यासाठी योग्य आहे. खास करून सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी काकाडी खाल्ल्याने दिवसभर रिफ्रेश राहण्यास मजत होते.

तसचं यावेळी काकडी खाल्ल्याने मेटाबोलिक रेट वाढून पोटाच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होवू शकते. त्यामुळे खास करून ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्यांनी प्रकर्षाने रात्री काकाडी खाणं टाळावं,

काकडी खाल्ल्यावर पाणी पिणं टाळावं- काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं टाळावं. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असत. त्यावर लगेचच पाणी प्यायल्यास काकडीतील पोषक तत्व शरीराला शोषून घेण्यास अडचणीचं ठरतं.

तसचं काकडी खावून लगेचच पाणी प्यायल्यास जुलाब लागण्याची शक्यता असते. त्याचसोबतच यामुळे शरिरातील ग्लाइसेमिक इंडेक्स जलद गतीने वाढण्यास सुरुवात होते. परिणामी पचन शक्ती मंदगतीने होते. यामुळे आरोग्याच्या काही समस्या निर्माण होवू शकतात. यामुळेच काकडी खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये. 

काकडीचं अधिक प्रमाणात सेवन हानीकारक- काकडीचं जास्त प्रमाणात सेवन करणंही हानीकारक ठरू शकतं. यामुळे एलर्जी होवू शकते. तसचं हायपरक्लेमिया सारखी आरोग्याची समस्या ट्रीगर होवू शकते. यामुळे सूज, गॅस आणि किडनीशी संबंधीत समस्या निर्माण होवू शकतात.

तसचं काकडीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं. त्यामुळेच काकडीचं सेवन जास्त प्रमाणात केल्यास पोटदुखीची समस्या निर्माण होवू शकते. तसचं काकडीचं अतिसेवन यकृतासाठी हानिकारक ठरू शकतं.

काकडीच क्युकरबिटिन नावाचा विषारी पदार्थ आढळतो. त्यामुळे काकडीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात विषारी द्रव्य वाढण्यास सुरुवात होते आणि यकृताशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. 

त्यामुळेच उन्हाळ्यात काकडी खाणं पोटाला आरामदायी वाटत असलं तरी तिचं सेवन करताना या गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. योग्य प्रमाणातील काकडीचं सेवन तुम्हाला नक्कीच आरोग्यदायी ठरेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT