Neck Pain google
आरोग्य

Neck Pain : मानदुखीमुळे येणारी चक्कर, मळमळ, उलट्या टाळण्यासाठी हे व्यायाम करा

सर्व प्रथम, सोफा किंवा बेडवर बसा. आता त्यावर अशा प्रकारे झोपा की तुमचे खांदे सोफ्यावर किंवा बेडवर ठेवलेले असतील आणि मान खाली लोंबकळेल.

नमिता धुरी

मुंबई : पूर्वी वृद्धांमध्ये मानेची समस्या असायची. मात्र बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आता लहान मुलांना आणि तरुणांनाही मानेची समस्या जाणवू लागली आहे. यावर मात करण्यासाठी रोज दोन व्यायाम करावेत.

मानदुखीची लक्षणे

पाठीच्या कण्याचं वरचं टोक मानेमध्ये असतं. ते कमकुवत किंवा खराब झाल्यावर मानदुखी सुरू होते. चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळ होणे, डोकेदुखी, मान व खांद्यामध्ये तीव्र वेदना होणे, मान ताठ होणे इत्यादी लक्षणे आहेत. हेही वाचा - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

मानदुखी का होते ?

शरीराची स्थिती बिघडल्याने मानदुखी सुरू होते. डोके झुकवून मोबाईल वापरणे, खाली वाकून बसणे, संगणक-लॅपटॉपवर तासनतास काम करणे इत्यादी चुकीच्या सवयींमुळे मानदुखी होते.

मानदुखीसाठी व्यायाम

सर्व प्रथम, सोफा किंवा बेडवर बसा. आता त्यावर अशा प्रकारे झोपा की तुमचे खांदे सोफ्यावर किंवा बेडवर ठेवलेले असतील आणि मान खाली लोंबकळेल. डोक्याच्या मागे हात घेऊन ते ताणा. १० सेकंद या स्थितीत रहा आणि श्वास घ्या. शेवटी, आरामात सरळ करा. असे ५ ते १० वेळा करा.

सोफा किंवा बेडवर बसा. पाय पुढे सोडा. गुडघे न वाकवता हात पायाच्या बोटांच्या दिशेला ताणा. यानंतर डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि उजव्या हाताने डाव्या पंजाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

ही काळजी घ्या

पहिल्या व्यायामात मान लोंबकळल्यानंतर चक्कर येत असेल तर आरामात सरळ करा. रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर ३ तासांनंतर मानेचे व्यायाम करा. व्यायाम करताना आरामदायक सैल कपडे घाला.

मानेच्या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी या व्यायामांचा नित्यक्रमात समावेश करा. हळूहळू मानेचे स्नायू मजबूत होतील आणि वेदना थांबतील.

सूचना : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT