ऑक्‍टोबर हीटचा वाढणार जोर! 'अशी' घ्या काळजी Canva
आरोग्य

ऑक्‍टोबर हीटचा वाढणार जोर! 'अशी' घ्या काळजी

ऑक्‍टोबर हीटचा वाढणार जोर! 'अशी' घ्या काळजी

श्रीनिवास दुध्याल

सध्या चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढलेला आहे. पण पावसाने उघडीप दिल्यानंतर कडक उन्हाचा चटकादेखील वाढला आहे.

सोलापूर : पावसाचा जोर वाढत असला तरी पाऊस उघडल्यास कडाक्‍याच्या उन्हामुळे तापमानातील (Temperature) वाढ ही ऑक्‍टोबर हीट (October Heat) समजली जाते. या कालावधीत संसर्गजन्य आजारांचा जोर, ऋतूसंधी व कमी झालेली रोगप्रतिकारक्षमता यावर मात करणे आवश्‍यक ठरते. सध्या चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढलेला आहे. पण पावसाने उघडीप दिल्यानंतर कडक उन्हाचा चटकादेखील वाढला आहे. दिवसातील कमाल व किमान तापमानात वाढलेली तफावत ही ऑक्‍टोबर हीट म्हणून ओळखली जाते.

पावसाळा संपून हिवाळा सुरू होत असताना या ऋतूसंधीच्या कालावधीत उष्णतामान वाढते. त्यासोबत वाढत्या तापमानाशी जुळवून घेताना शरीराची प्रतिकार क्षमता घटते. सध्या संसर्गजन्य किंवा विषाणूजन्य आजारांचा जोर वाढलेला असतो. ओलसर कपडे वापरल्याने त्वचेचे आजारदेखील बळावतात. सध्या शहरात डेंग्यू, ताप अशा आजाराच्या साथी सुरू आहेत. अशक्तपणा, प्रतिकारक्षमता कमी होणे, अस्वस्थ वाटणे, घाम येणे आदी अनेक लक्षणे पाहावयास मिळतात.

असा असूद्या आहार-विहार

  • हलका आहार असावा

  • पिण्याचे पाणी अधिक प्रमाणात घ्यावे

  • व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा खाद्यात समावेश असावा

  • शिळे अन्न खाऊ नये

  • तेलकट व पित्त वाढवणारे पदार्थ जेवणात टाळावेत

  • शरीरात क्षार वाढवणारे पदार्थ घ्यावेत

  • नारळ पाणी, लिंबू पाणी, आवळा ज्यूस, कोकम सरबत उपयोगी

काय काळजी घ्यावी?

  • ओलसर कपडे वापरू नयेत

  • दोन दिवस ताप व अशक्तपणा असल्यास थेट डॉक्‍टरांकडे तपासणीसाठी जावे

  • त्वचा कोरडी नसेल तर बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो

  • प्रतिकारक्षमता कायम ठेवण्यासाठी आहार सुव्यवस्थित असावा

नागरिकांनी दोन दिवस ताप किंवा अस्वस्थ वाटल्यास तत्काळ डॉक्‍टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे आहे. सात्विक आहार व भरपूर पाणी प्यावे. "व्हिटॅमिन सी'युक्त फळे खावीत.

- डॉ. आरिफ तडमोड

शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य असावे. जुने कपडे धुताना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रुमाल किंवा मास्क वापरावा. डेंग्यू व चिकुन गुनियाची साथ असल्याने निदान व उपचार तत्काळ करावेत.

- डॉ. प्रवीण ननवरे

ऋतूसंधीचा हा काळ असल्याने तापमानातील फरक मोठा असतो. त्यामुळे सी जीवनसत्त्वयुक्त फळे खावीत. संसर्गजन्य आजारांचा जोर व प्रतिकारक्षमता कमी या विसंगतीपासून योग्य संतुलित ताजा आहार घेत काळजी घ्यावी.

- डॉ. अतुल लामकाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मंत्री संजय राठोड याचं वर्चस्व कायम; यवतमाळमधील दारव्हा, नेर पालिकेवर नगराध्यक्ष विजयी

Nagar Panchayat News Sangli : हाय व्होल्टेज ड्रामा झालेल्या सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेत कोणाची आली सत्ता, जयंत पाटील गेमचेंजर

Atpadi Nagaradhyaksh Result: आटपाडीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण नगराध्यक्षपद भाजपकडे; पडळकरांचा दे धक्का

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

SCROLL FOR NEXT