Tobacco and Smoking is injuries to Health Sakal
आरोग्य

फक्त कॅन्सरच नाही, तंबाखू अन् धुम्रपानामुळे उद्भवतात या समस्या

Tobacco and Smoking: तंबाखूतील घातक रसायनातून ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’ होऊ शकतो.

केवल जीवनतारे ः @kewalsakal

सिगारेटचे झुरके मारणे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. किशोरवयीन मुली-मुलींसह युवावर्ग सिगारेटच्या आहारी गेले आहेत. परंतु, सिगारटेमधील (Cigarette) तंबाखूत असलेली घातक रसायने शरिरात गेल्यास डोके आणि मानेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रत्येक सहा सेकंदमध्ये एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. विशेष म्हणजे ‘सिगारेट ओढणे हे आरोग्यास हानिकारक आहे’, असा वैधानिक इशारा पाकिटवर लिहिलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. (These problems are caused not only by cancer but also by tobacco and smoking)

तंबाखूतील घातक रसायने ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’साठी (Head and Neck Cancer) ८५ टक्के जबाबदार आहेत.कॅन्सरच नाही तर तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवन आणि धुम्रपानातून हृदयावर घातक परिणाम होतात. तंबाखु सेवन तसेच फिल्टर सिगारेट तेवढीच घातक असून बहुतेक रक्तवाहिन्यांवरही होत असतो. तंबाखुमुळे दरवर्षी जगात सात दशलक्ष मृत्यू होतात आणि जगातील धुम्रपान करणारे जगातील ८० टक्के नागरिक हे अल्प व मध्यम उत्पन्न गटातील आहेत. तंबाखुमुळे दरवर्षी जगात सात दशलक्ष मृत्यू होतात आणि जगातील धुम्रपान करणारे जगातील ८० टक्के नागरिक हे अल्प व मध्यम उत्पन्न गटातील आहेत.

धुम्रपानाचे धोके-

कॅन्सरह हृदय विकाराची जोखीम वाढते

श्‍वासनलिका आणि फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत घट

रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

श्‍वासनलिकांच्या आकुंचन-प्रसरणावर परिणाम

संधिवाताचा धोका सिगारेटमधील तंबाखू हा घटक काही प्रमाणात कारणीभूत ठरतो

निकोटिनमुळे महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजन प्रेरकांवर परिणाम

तंबाखुची विविध रूपे-

तंबाखू, मावा, गुटखा, पान, तंबाखू, चुना-तंबाखू, बिडी, सिगारेट, गांजा, चिलीम, हुक्का तसेच तंबाखूची मिश्री, तंबाखूची पेस्ट, तपकीर

निकोटनची कमाल!-

तंबाखू, बिडी किंवा सिगारेटचा वापर वारंवार करावा, अशी इच्छा निर्माण करणारा घटक म्हणजे निकोटिन. निकोटिनचे तंबाखूतील प्रमाण जितके अधिक, तितके त्याचे व्यसन लागण्याची शक्यता अधिक असल्याचे मेडिकल-सुपरचे श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT