High Cholesterol esakal
आरोग्य

High Cholesterol : लहान मुलांमध्येही वाढतोय कोलेस्ट्रॉलचा धोका, नियंत्रणात ठेवण्यासाठी करा हे उपाय

लहान मुलांमध्ये नेमकी कोणत्या कारणाने कोलेस्ट्रॉलची समस्या वाढते तसेच त्यावर उपाय काय ते आपण जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

High Cholesterol In Children : हल्ली चुकीच्या आहारामुळे केवळ मोठ्यांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येसुद्धा कोलेस्ट्रॉलच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. लहानपणापासूनच या त्रासाला सुरुवात झाल्याने तरुण्यात या समस्या आणखी धोकादायक ठरू शकतात. लहान मुलांमध्ये नेमकी कोणत्या कारणाने कोलेस्ट्रॉलची समस्या वाढते तसेच त्यावर उपाय काय ते आपण जाणून घेऊया.

हे आहे लहान मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण

लहान मुलांना पौष्टीक आहारापेक्षा चटपटीत पदार्थ खायला जास्त आवडते. जसे की जंक फूड. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते. बहुतांश मुले ही मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीपुढे बसली असल्याने त्यांची शारीरिक हालचालदेखील कमी होते. त्या कारणानेसुद्धा लहान मुलांमध्ये वजन वाढण्याच्या समस्या निर्माण होऊन हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्या वाढू शकतात.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी करा हे उपाय

  • फॅट्स, सॅच्युरेटेड फॅट्स कमी असलेले पदार्थ मुलांना खायला द्यावे.

  • ररोज नियमितपणे व्यायाम करावा, सायकल चालवणे, पोहोणे, धावायला जाणे आणि बाहेर खेळण्याची मुलांना सवय लावावी. त्याने त्यांची शारीरिक हालचाल होते.

  • मुलांचे वजन नियंत्रणात ठेवावे.

  • पोषक तत्वं असलेला आहार मुलांना खाण्यास द्यावा

  • सॅच्युरेटेड फॅटऐवजी अनसॅच्युरेटेड फॅटचा वापर करावा (Health)

लहान मुलांना जेवढ्या जास्त फिजीकल अॅक्टिव्हीटी करता येईल तेवढ्या पालकांनी त्यांच्याकडून करून घ्याव्यात. त्याने तुमच्या मुलांचे आरोग्य चांगले राहील. सोबतच त्यांचा शारीरिक अंगांचा विकासही होईल. अतिवेळ टीव्हीसमोर स्थूलपणे बसल्याने मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात अडचणी येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Nagpur Election: प्रभाग रचनेने धक्का, आता आरक्षणावर नजर; किरकोळ बदलांसह महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छुकांमध्ये नाराजी

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

SCROLL FOR NEXT