Health Ghee Benefits
Health Ghee Benefits  esakal
आरोग्य

Health Ghee Benefits : थायरॉईडच नाही तर अनेक आजारांवर गुणकारी आहे तूप

सकाळ डिजिटल टीम

Ghee Benefits For Health : गरम भात आणि वरणाच्या कॉम्बिनेशनवर तूप तर पाहिजेच ना राव. वरण भात, पुरणपोळी, मोदक, खिचडी या पदार्थांची तूपाशिवाय आपण अजिबातच कल्पना करू शकत नाही. तूप म्हणजे आहारातील महत्त्वाचा भागच आहे. बऱ्याच जणांना वाटतं की, तूप खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते. मात्र असं काहीही नाही. मुळात वजन अथवा चरबी ही तुपामुळे नाही तर तेलामुळे वाढते हे तुम्ही मनात पक्कं करून घ्या.

तुम्ही रोज दिवसभरातून एक ते दोन चमचा तूप खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूप खाल्ल्याने नसांची लवचिकता आणि ताकद वाढते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी देशी गायीचे तूप खाण्याचा सल्ला दिला जातो.

तूप खाल्ल्याने वजन वाढते आणि परिणामी हृदयाशी संबंधित आजाराचा धोका वाढतो हा जसा गैरसमज आहे. कारण तूप स्निग्ध आहे. त्याचप्रमाणे थायरॉईड असल्यास तूप सेवन करू नये हा देखील एक मोठा गैरसमज आहे. तसे काही नाही. उलट गायीचे शुद्ध तूप शरीरातील हार्मोनल असंतुलन दूर करण्याचे काम करते. यामुळे थायरॉईड नियंत्रित राहतो. त्यामुळे खाण्यास कोणते तूप चांगले आणि त्याने काय फायदे होतात हे पाहुयात.

तुपाच्या गुणधर्मांबद्दल बोलताना ते शुद्ध तूप असावे इतकेच सांगितले जाते. पण खाण्यासाठी देशी गायीचे तूप कधीही उत्तम ठरते. गायीही वेगवेगळ्या जातीच्या असतात. आपल्या देशात तसेच आयुर्वेदात देशी गाईच्या तुपाला खूप महत्त्व आहे. तुम्हाला शुद्ध देशी गायीचे तूप गोशाळेतही मिळेल. त्यामूळे अशा तूपात भेसळ असेल असे वाटणे चुकीचे आहे.

बुटीरिक ऍसिड असते. हे शरीरात टी-सेल्सची संख्या वाढते. कारण या पेशी बनवण्यासाठी शरीराला गरज असते. आपल्या शरीराला टी-सेल्स पेशींची गरज असते. त्या पेशी बनवण्यासाठी ब्युटीरिक अॅसिडचीयुक्त पदार्थ खाण्याची गरज असते. ते आपल्याला गाईच्या तुपातून मिळते. व्हायरल विषाणू, बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजंतूंशी लढण्यासाठी टी-पेशी शरीरात काम करतात.

कोरोना हा देखील असाच एक विषाणू आहे.गाईचे तूप हे शरीरासाठी एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जे शरीराला आतून पोषण देते आणि त्वचेतील स्ट्रेचबिलिटी, चमक आणि आयुष्य वाढवते. तूप हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठी देखील आहे.

तुपाचे नियमित सेवन केल्याने त्वचेच्या आजारांचा धोका कमी होतो, शरीरात कोरडेपणा येत नाही आणि केसांची वाढही चांगली होते. केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते.

कोणत्या आजारांमध्ये तूप सेवन करावे?

पचनाच्या समस्या, लठ्ठपणा कमी करण्यासाठी तूप फायदेशीर आहे.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, लॅक्टोजची कमी, हाडांचा ठिसूळपणा यावर मात करण्यासाठी

मानसिक थकवा टाळण्यासाठी तूप मदत करते.

महिलांमध्ये उपचारांमध्ये पीरियडशी संबंधित समस्या, भूक कमी लागत असल्यास गायीचे तूप खाणे फायदेशीर ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT