Women Health sakal
आरोग्य

Women Health : महिलांनी कोणत्या वयात कोणत्या टेस्ट कराव्यात?

Women Health: आरोग्याचे धोके वेळीच ओळखा; योग्य वयात योग्य टेस्ट करा

निकिता जंगले

सुदृढ आरोग्य हे प्रत्येकालाच हवे असते आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपण वाटेल ते प्रयत्न करतो पण अनेकदा आपल्याला विविध आजारांशी सामना करावा लागतो कधी कधी पूर्व काळजी म्हणून काही टेस्ट करणेही गरजेचे असते. फॅमिली फिजिशियन डॉ. अनिल पाटील यांनी कोणत्या वयात आपण कोणत्या टेस्ट कराव्यात, याविषयी सकाळशी संवाद साधताना सांगितले.

डॉ. अनिल पाटील म्हणतात...

  • लहानपणापासून लहान मुलांच थायरॉईड तपासणे गरजेचे आहे. डिलिव्हरीनंतरही काही काही मूलभूत टेस्ट करणे बंधनकारक आहे.

  • लहान मुलांमध्ये एलर्जीचे चे प्रमाण अधिक असते. त्यावेळी हेमोग्राम टेस्ट करावी.

  • शाळेत गेल्यानंतर मुलांना ब्लड ग्रुप माहिती असणे आवश्यक असतं.

  • काही मुलं खेळताना लवकर थकतात, अभ्यासात मन लागत नाही, मुलांची चि़डचिड होते अनेकदा अशा केसेस मध्ये मुलांचा डाईट व्यवस्थित नसतो. अशावेळी हिमोग्लोबीन कमी असू शकते, आयरन डिफिसीअन्सी तसेच व्हीटामिन्सची सुद्धा कमतरता असू शकते.

  • १८ वर्षानंतर मुलींना मासिक पाळी दरम्यान पीसीओडीचा त्रास अधिक होतो. अशावेळी मुलींना सोनोग्राफी केलेली बरी असते.

  • १६ वर्षानंतर मुलींनी सोनोग्राफी, थायरॉईड आणि हेमोग्राम टेस्ट केलेलं अधिक चांगलं आहे. वेटलॉस किंवा वेटगेन किंवा पीसीओडीचा त्रास असेल तर सोनोग्राफी करावी.

  • लग्नाच्या आधी HBsAg किंवा HIV सारख्या टेस्ट कराव्यात.

  • वयाच्या ३१व्या वर्षी मेटाबोलिस्म डिसऑर्डर, हेमोग्राम, लुपीड प्रोफाईल, ब्लड शुगर किडनी फंक्शन टेस्ट कराव्यात. या आजारांना वयाची लिमिट नाही कारण हल्ली कमी वयात खूप लवकर स्ट्रेस येतो.

  • स्त्रियांनी चाळीशी नंतर कुठे गाठ आली असेल किंवा कुठे त्रास वाटत असेल तर त्या त्याचवेळी टेस्ट कराव्यात

  • ४० नंतर महिलांनी गर्भाशयाचा भागावर कोणतेही इनफेक्शन तर नाही हे तपासावे.

  • वयोवृद्ध व्यक्तींनी सहा महिन्यांनी फुल बॉडी चेकअप करावा.

डॉ. अनिल पाटील म्हणतात, "लग्नाच्या आधी कुंडली जोडण्याचा जसा अट्टाहास आपण करतो तसाच अट्टाहास लग्नाआधी टेस्ट करण्याचाही करावा. सोबतच तरुणांनी जीम मध्ये जाताना इंजेक्शनचा वापर करू नये. आरोग्यानुसार योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. जिम लावावी पण जिमला बॉडी बिल्डिंगचा मार्ग समजू नये. जीम करताना विशेष काळजी घ्यावी त्यापेक्षा योगा आणि व्यायाम अधिक उत्तम आहे."

"बदलत्या राहणीमानानुसार लाईफस्टाईलमुळे कोणत्याच आजाराला वयाचे बंधन नाही त्यामुळे टेस्ट करताना सुद्धा वयाचे बंधन ठेऊ नये किंवा वय बघू नये", असे ही ते म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT