Stomach Gas Relief Tips Marathi  
आरोग्य

Stomach Gas Relief: पोटात सतत गॅस होतोय? न्युट्रिशनिस्टनी दिलेला सल्ला करेल चमत्कार, कसे ते वाचा

Stomach Gas Relief Tips: तुम्ही या पदार्थांचे सेवन करणे थांबवा,अन्यथा होतील गंभीर आजार

Pooja Karande-Kadam

Stomach Gas Relief Tips : काही मसाल्याचे पदार्थ खाल्ले की पोटात जास्त गॅस तयार होतो. यासाठी घरगूती उपायासोबत मेडीकलमध्येही येरझाऱ्या घालाव्या लागतात. पोटात गॅस होणे ही गोष्ट आता लोकांसाठी सवयीची बनली आहे.

गॅसमूळे पोटात गोळा येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, छाती जड होणे, असे आजारही सुरू झाले आहेत.  याबद्दल न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.

कांदा-लसूण, कोबी अशा अनेक गोष्टी खाल्ल्यानंतर लगेच गॅस तयार होतो. ज्या लोकांची पचनशक्ती खराब असते, त्यांना हा त्रास जास्त होतो. गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी त्यांनी रेसिपीही सांगितली आहे. पण आधी जाणून घेऊया कोणत्या गोष्टींमुळे गॅस तयार होतो.

बिन्स

बिन्स आरोग्यासाठी चांगल्या आहेत. त्यातील फायबर तुम्हाला अनेक फायदे मिळवून देते. तसेच त्याचे अनेक तोटे देखील आहेत. तुम्हाला जर बिन्स खाल्ल्याने गॅसची तक्रार सुरू होत असेल.

तर, समजून जा की तुम्ही बिन्स खाल्ल्यामुळे असे होत आहे. कारण, यात असलेले फायबरचे उच्च प्रमाण आणि oligosaccharides  नावाची शुगर पोटात गॅस निर्माण करते.

कोबी

कोबी मंच्युरियन, कोबीचे सलाद यासारख्या अनेक कारणांनी कोबी आपल्या पोटात जातो. कच्चा कोबी खाणारेही अनेक लोक आहेत. पण, या पदार्थामुळे गॅसेसच्या अनेक समस्या उद्भवतात.

कोबी, ब्रोकोली आणि केळी या भाज्यांमध्ये raffinose प्रकारची साखर असते. हि साखर शरीराला पचायला जड असते. त्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणावर गॅस तयार होतो.

कांदा - लसूण

कोणताही मसाला कांदा-लसणाशिवाय अपुर्णच. त्यामूळे तुम्ही व्हेज खा किंवा नॉनव्हेज त्यामध्ये कांद्याचा समावेश असतोच. कांदे आणि लसूणमध्ये fructans चे प्रमाण जास्त असते. हे घटक म्हणजे सॉल्यूबल फाइबर असते. ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो. याशिवाय कच्च्या भाज्यांच्या सॅलडमुळेही ही समस्या उद्भवू शकते.

कोल्ड ड्रिंक्स

पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स पिणे हा एक सोप्पा उपाय मानला जातो. त्यामुळेच कोल्ड ड्रिंकची मागणीही वाढली आहे. पण हा लोकांचा भ्रम आहे. असे अजिबातच नाही. कोल्ड ड्रिंक्समध्ये असलेले कार्बन डायऑक्साइड पोटात गेल्याने गॅसचा त्रास अधिकच होतो.

यावर काय उपाय आहेत

  • रोजच्या जेवणानंतर ३० मिनिटांनी बडीशेप, जिरे आणि ओव्याचा काढा करून प्यावा.

  • रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी धण्याचे पाणी प्यावे

  • सोड्याचे पदार्थ खाणे बंद करा

  • जेवण सावकाश आणि नीट चावून खा

  • दिवसभरात भरपूर पाणी प्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT