World Mental Health Day esakal
आरोग्य

World Mental Health Day : मानसिक सुदृढतेसाठी साथ संवादाची

प्रबोधनाची गरज ठळक; तणावामुळे वाढतेय समस्या

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो.  याविषयी उघडपणे बोलायला समाज आजही तयार नाही. वाढत्या ताण-तणावामुळे तरुणांची बिघडती मानसिकता ही देशासमोरील मोठी समस्या म्हणून उद्भवू शकते. यावर मात करण्यासाठी संवाद वाढविण्याबरोबरच समाजात प्रबोधनाची गरज ठळक बनत आहे.

वाढत्या अपेक्षा, स्पर्धा, रोजगाराची असुरक्षितता, बेरोजगारी, कुटुंब व करिअरमधील वाढते ताण, बदललेले  नाते संबंध, धकाधकीमुळे वाढणारे नैराश्य व ताण, कोरोनानंतर निर्माण झालेली परिस्थिती अशी अनेक कारणे सध्या तरुणांमध्ये मानसिक संतुलन बिघडवणारी ठरत आहेत. यावर अनेक उपचार उपलब्ध असूनही मानसिक आरोग्याची फारशी दखल घेतली जात नसल्याने, या आजाराची व्याप्ती वाढत आहे.

मानसिक आजाराचे गांभीर्य आणि वाढते प्रमाण लक्षात घेऊन, केंद्र शासनाने मानसिक आरोग्य सेवा या सामान्य आरोग्य सेवा-सुविधांचा अविभाज्य भाग मानून दुर्गम, ग्रामीण भागातील लोकांना त्या उपलब्ध करून देण्यासाठी ऑगस्ट १९८२ मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला, मात्र इतक्या वर्षांनंतर आजही  या कार्यक्रमास गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही.

भारतात दोन कोटी लोकांना सेवा देण्यासाठी १५ ते २० हजार मानसोपचार तज्ज्ञांची गरज असताना, केवळ चार हजार पेक्षाही कमी मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. आजाराचे वेळेवर निदान, उपचारांनी आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सक्षम करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 

उत्तम मानसिक आरोग्यासाठी

- मित्र परिवारामध्ये प्रत्यक्ष रमा  उत्तम आहार विहार व आरोग्य

- सांभाळा  किमान सात तास झोप घ्या  स्वतःचा छंद जोपासा 

- दिवसातील हार-जीत स्वकियांशी चर्चा करा वर्षातून एकदा

- मेंटल हेल्थ तपासणी करून घ्या

मानव हा सामूहिक प्राणी आहे. सध्या या समूहातूनच  विलग होण्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रत्येक समस्येवर उपाय असतो, हा उपाय शोधण्यासाठी व आधार देण्यासाठी सोबत आप्तस्वकीयांची साथ हवी असते. सध्या वाढत्या मानसिक समस्या ही संवाद तुटल्याचे परिणाम आहेत.   

- डॉ. अश्विन शहा, मानसोपचार तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Jayakumar Gore: ‘उन्होंने खुद के गिरेबान में झाँकना चाहिये...’; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा धैर्यशील मोहिते-पाटलांना टोला

Punjab Floods : पंजाबमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात, लासलगावहून ४० टन कांदा रवाना; व्यापाऱ्यांचा पुढाकार

आयुषचा मृतदेह हत्येच्या ३ दिवसानंतरही ससूनमध्येच, अंत्यसंस्काराला इतका वेळ का?

IPS Anjana Krishna: 'आयपीएस अंजना कृष्णा यांना समर्थन वाढू लागले'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची संभाषणाची क्लिप देशभर व्हायरल

Maratha Reservation : मराठा आरक्षण, १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २७ मराठा कुटुंबांना मदतीचा दिलासा

SCROLL FOR NEXT