Yoga For Alzheimer  esakal
आरोग्य

Yoga For Alzheimer : अल्झायमरपासून बचाव करण्यासाठी 'ही' योगासने आहेत फायदेशीर, उत्तम स्मरणशक्तीसाठी दररोज करा सराव

Yoga For Alzheimer : अल्झायमर हा जगभरात झपाट्याने वाढणारा एक गंभीर आजार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Alzheimer : अल्झायमर हा जगभरात झपाट्याने वाढणारा एक गंभीर आजार आहे. न्यूरोलॉजिकल विकारांपैकी एक असणारा हा आजार ६० पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. जगभरातील डॉक्टरांना ही या आजारामागची कारणे अद्याप नीट समजू शकलेली नाहीत. अल्झायमरच्या आजाराला मराठीत स्मृतीभ्रंश असे म्हटले जाते.

शास्त्रज्ञांना सुद्धा या आजारामागची कारणे नीट जाणून घेता आलेली नाहीत. तज्ज्ञांच्या मते, या आजारापासून बचाव करण्यासाठी योगा फायदेशीर आहे. योगासनांचा नियमित सराव केल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास तसेच, या आजाराची तीव्रता कमी करण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात या आजारापासून बचाव करणारी योगासने कोणती?

वज्रासन

अल्झायमर या आजारापासून बचाव करण्यासाठी तुम्ही नियमितपणे वज्रासन या योगासनाचा सराव करा. या योगासनाचा सराव केल्याने मन शांत आणि स्थिर राहते. पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी देखील हे योगासन लाभदायी आहे. या आसनाचा नियमित सराव केल्याने अल्झायमर-डिमेंन्शियाचा धोका ही बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.

शीर्षासन

शीर्षासन हे योगासन आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाचा दररोज सराव केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. उंची वाढवण्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी हे योगासन उपयुक्त आहे.

विशेष म्हणजे रक्ताभिसरणाची प्रक्रिया वाढवण्यासाठी शीर्षासन या योगासनाचा सराव प्रभावी मानला जातो. या आसनाचा जर तुम्ही दररोज सराव केला तर शरीराची एकूण कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. अल्झायमर सारख्या आजारातही हे योगासन उपयुक्त आहे. शारिरीक अन् मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज या योगासनाचा सराव अवश्य करा.

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन हे योगासन अनेक प्रकारे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे योगासन नियमित केल्यास अल्झायमर आजाराचे घटक कमी करण्यास मदत करते.

महत्वाचे म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रूग्णांसाठी देखील हे योगासन फायदेशीर आहे. मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी, निद्रानाश, नैराश्य किंवा चिंता कमी करण्यासाठी पश्चिमोत्तनासनाचा दररोज सराव करणे उपयुक्त ठरते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT