Love horoscope 2026
esakal
Valentine Week 7 to 14 february-2026 Love Horoscope: दरवर्षी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन विकची सुरवात होते. यात सात दिवसांत रोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे असे वेगवेगळे खास दिवस साजरे केले जातात.
ग्रहांची चाल आणि ज्योतिषीय गणनांनुसार अनेक लोकांना या काळात योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. चला तर जाणून घेऊया की व्हॅलेंटाईन वीक कोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. ज्योतिषाचार्य नंदिता पांडेय यांच्याकडून जाणून घेऊया की हा आठवडा प्रेमजीवनासाठी कसा असेल.
७ फेब्रुवारी रोजी डेसह व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. सर्वात रोमँटिक बाब म्हणजे या आठवड्यात शुक्र ग्रह कुंभ राशीत बुध आणि राहुसोबत असेल आणि आठवड्याच्या शेवटी सूर्यदेखील कुंभ राशीत प्रवेश करेल. यामध्ये प्रेमाच्या नात्यांना नवे बळ मिळेल आणि लव्ह लाइफमध्ये वेग दिसून येईल. अशा परिस्थितीत रोज डेपासून व्हॅलेंटाईन डे पर्यंत मेष ते मीन सर्व राशींसाठी काळ कसा राहील, कोणत्या राशीचे लोक प्रेमाबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात, हे जाणून घेऊया.
व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. प्रेमसंबंधात समतोल ठेवल्यास मानसिक शांती मिळेल.हा आठवडा रोमँटिक असेल. आठवड्याच्या मध्यात जोडीदारासोबत थोडा वाद होऊ शकतो. विशेषतः भेटवस्तू किंवा खरेदीबाबत.
प्रेमाच्या बाबतीत या आठवड्यात जपून पावले टाका. विचारपूर्वक निर्णय घेतल्यासच सुख मिळेल. आठवड्याच्या मध्यात संवादाच्या माध्यमातून गैरसमज दूर होतील.
हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनासाठी अनुकूल आहे. सुरुवातीला रोमान्स वाढेल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल आणि नाते अधिक गोड होईल.
या आठवड्यात तुम्हाला नात्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. सुरुवातीला तिसऱ्या व्यक्तीमुळे मतभेद होऊ शकतात. संयम प्रयत्नांमुळे व्हॅलेंटाईन डे पर्यंत परिस्थिती सुधारेल.
हा आठवडा सुख- समृद्धी घेऊन येईल. प्रेमजीवनात शांती आणि नव्या सुरुवातीचे संकेत आहेत. आठवड्याच्या मध्यात परस्पर प्रेम वाढेल आणि जोडीदाराकडून भक्कम पाठिंबा मिलेल.
हा आठवडा प्रेमासाठी अतिशय अनुकूल आहे. नात्यावर लक्ष केंद्रीय केल्यास आनंद वाढेल. काही जणांसाठी विवाहाचे योग बनू शकतात.
या आठवड्यात प्रेमजीवनात सकारात्मक बदल दिसतील. नव्या विचारांनी पुढे गेल्यास नाते अधिक घट्ट होईल. मध्य आठवडा विशेषतः सुखद ठरेल.
व्हॅलेंटाईन वीक तुमच्यासाठी रोमँटिक ठरेल. सुरुवातीला प्रेम वाढेल आणि चांगली बातमी मिळू शकते. मात्र मध्यभागी मतभेद संभवतात, त्यामुळे संयम ठेवा.
या आठवड्यात भावनिक अस्वस्थता जाणवू शकते. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शांतपणे निर्णय घ्या.
हा काळ नात्यांसाठी शुभ आहे. प्रेम आणि समज वाढेल. भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल.
प्रेमाच्या बाबतीत हा काळ अनुकूल आहे. नात्यात उत्साह राहील. नवी सुरुवात आणि आत्मविश्वासामुळे यश मिळेल.
हा आठवडा आनंददायी ठरेल. प्रेमसंबंधातून सुखद बातमी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी थोडी अस्वस्थता जाणवू शकते, पण एकूण काळ शुभ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.