Bollywood Actress: बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या चाहतावर्ग (Bollywood News) मोठा आहे तो त्यांच्या दिसण्यामुळे. हटका लूक आणि स्टाईल यामुळे त्या अभिनेत्रींना सोशल मीडियावर चाहतावर्गही मोठा आहे. हॉलीवूडमध्ये (Hollywood news) अभिनेत्रींमध्ये प्लॅस्टिक सर्जरीचा ट्रेंड आला. तो काही काळानं बॉलीवूडमध्येही पाहायला मिळतो आहे. आपल्याकडे अनेक अभिनेत्रींनी मोठ्या (Social media) प्रमाणावर प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे दिसून आले आहे. या लेखाच्या निमित्तानं आपण बॉलीवूडमधील अशा अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी प्लॅस्टिक सर्जरी करुन बॉलीवूडमध्ये कमबॅक केले आहे. बॉलीवूडमध्ये आतापर्यत अनेक अभिनेत्रींनी ओठ, नाक, कान, चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.
अनुष्का शर्मा - अनुष्का जेव्हा पीके चित्रपटामध्ये दिसली तेव्हा तिनं प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे दिसून आले होते. तिनं ओठांची सर्जरी केली आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. एका मुलाखतीतून अनुष्कानं त्याबाबत माहिती दिली होती. श्रृती हासन - टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांची मुलगी श्रृती हासन ही तिच्या हटक्या स्टाईलमुळे ओळखली जाते. ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. कोणतीही व्यक्ती ही कुणावर टिप्पणी करु शकत नाही. तिचं परिक्षण करु शकत नाही. प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. असं तिनं सांगितलं होतं. शिल्पा शेट्टी - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा ही तिच्या फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाते. शिल्पानंही प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे दिसून आले आहे. तिच्या बऱ्याचशा चाहत्यांना ही गोष्ट माहिती नाही. एका मुलाखतीमध्ये शिल्पानं याबाबत खुलासा केला होता. कोयना मित्रा - ओ साकी साकी गर्ल म्हणून कोयना मित्रा बॉलीवूडमध्ये चर्चेत आली होती. तिनं अपना सपना मनी मनीमध्ये काम केलं होतं. तिनं देखील काही वर्षांपूर्वी प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे दिसून आले होते. त्यावरुन तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. राखी सावंत - टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून राखीचे नाव घ्यावे लागेल. बिग बॉसच्या गेल्या सीझनमध्ये राखीनं धुमाकुळ घातला होता. तिच्या भूमिकेनं बिग बॉसची लोकप्रियता कमालीची वाढली होती. वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखीनं ब्रेस्ट सर्जरी देखील केली आहे. ड्रामा क्वीन राखीनं नाकाची सर्जरी केल्याचे सांगितले जाते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.