After Marraige Tips esskal
फोटोग्राफी

मुलींनो, लग्नानंतर नातं, करिअरचा समतोल कसा साधाल? चार गोष्टी युक्तीच्या

नाते आणि करिअर दोन्हीचे व्यवस्थापन जमणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

लग्नानंतर महिलांना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावे लागते. करिअर आणि नातेसंबंध सांभाळण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी (Care) घ्यावी लागते. लग्नानंतर ( After Marraige) तुम्ही तुमच्या नात्याला (Relation)तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तसंच करिअऱकडे(Carrier) दुर्लक्ष झाले तर, भविष्यात अडचणी येऊ शकतात. यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास नाते आणि करिअर दोन्हीचे व्यवस्थापन चांगले करता येईल.

घरी ऑफिसच्या गोष्टी बोलू नका- ऑफिसचे काम (Office Work) तिथेच सोडून या. त्याविषयी घरी बोलत बोलत बसणे नात्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे तुमचे काम पूर्ण संपवूनच घरी या. घरी वारंवार ऑफिसचे फोन येऊ नयेत. जर असे फोन सारखे येत राहिले तर तुमचा जोडीदार तुमच्यावर वैतागण्याची शक्यता आहे.पण, ऑफिसचे काम पूर्ण न झाल्यास बॉससमोर घरच्या अडचणी सांगत बसू नका.
एकमेकांना थोडं अधिक समजून घ्या:- जर तुम्ही दोघंही काम (Work) करत असाल तर एकमेकांचे काम समजून घेतले पाहिजे. आणि त्या कामाचा आदर केला पाहिजे. तसंच, एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. घरातील कामे वाटून घ्या. असे केल्याने बराच त्रास कमी होईल.
एकमेकांसाठी वेळ काढा- दिवसातला (Day )काही वेळ (Time) एकमेकांसाठी राखून ठेवा. यावेळी कामाविषयी चर्चा करण्यापेक्षा भविष्याबद्दल बोला. तुम्ही सकाळचा चहा किंवा रात्रीचे जेवण एकत्र करून एकमेकांसोबत वेळ घालवू शकता. सकाळ किंवा संध्याकाळ चालायला जाताना चर्चेसाठी वेळ काढता येऊ शकेल.
एकमेकांपासून काही लपवू नका- एकमेकांपासून काही लपवू नका. ऑफिसचे काम जास्त असल्याने तुम्हाला उशीर होणार असेल तर तशी कल्पना आधीच जोडीदाराला द्या. तसेच ऑफिसमधले काही टेन्शन असेल तर त्याविषयी जोडीदाराला सांगा. यामुळे तुमच्या दोघात गैरसमज होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Updates : पंढरपुरात मुसळधार पावसाला सुरुवात

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

Solapur News: 'विठुरायाच्या मंदिराला एक कोटीचा चांदीचा दरवाजा'; गुरुपौर्णिमेला दोन शिष्यांची गुरूला अनोखी दक्षिणा

SCROLL FOR NEXT