Serial killer Balu aka Mukunda lohas
Serial killer Balu aka Mukunda lohas esakal
जळगाव

Jalgaon : ‘त्या’ सिरीयल किलरविरुद्ध खुनाचे 2 गुन्हे दाखल

रईस शेख

जळगाव : किनगाव (ता. यावल) येथील एका वृद्धेच्या हत्येप्रकरणात (Murder) अटकेतील बाळू ऊर्फ मुकुंदा बाबूलाल लोहार (वय २८) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. चपलेवरून या संशयिताचा गुन्हे शाखेने शोध घेत पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान त्याने इतर दोन खुनाचे गुन्हे कबूल केले होते. आता या प्रकरणात यावल पोलिसांत दोन वेगवेगळे खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. संशयित मुकुंदा लोहार याला पोलिस कोठडीत रवाना केले आहे. (2 murder cases filed against serial killer Jalgaon Crime News)

किनगाव (ता. यावल) येथील मराबाई सखाराम कोळी (वय ७५) या वृद्धेचा रूमालाने गळा आवळून मुकुंदा लोहार याने हत्या केली होती. कुठलेही ठोस पुरावे नसताना घटनास्थळावर मिळालेल्या चपलेवरून संशयिताला शोधून काढण्याचे कसब गुन्हे शाखेच्या पथकाने दाखविले असून, अटकेतील मुकुंदा लोहार याची ‘खातरपाणी’ करताना त्याने एकामागून एक तीन खुनाची कबुली दिल्याने पोलिस दलही चक्रावले होते. एकट्या वृद्ध महिलांना लक्ष करून त्यांच्या हत्येनंतर अंगावरील दागिने, रोकड लुटण्याचा धंदा मुकुंदा याने चालविला होता. पोलिस तपासात इतर खुनाचे गुन्हे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्वतः संबंधित कुटुंबीयांशी चर्चा केल्यावर विस्तृत माहिती उघडकीस आल्यावर याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दुसरा खून

सुरेश चैत्राम सुरवाडे (रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) यांनी नव्याने फिर्याद दाखल केली आहे. २८ फेब्रुवारी २०२१ ला सुरेश सुरवाडे यांची आई द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे (रा. चांभारवाडा, किनगाव) यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. मात्र, त्यावेळेस संशयास्पद मृत्यू असतानाही आकस्मिक मृत्यूचाच गुन्हा दाखल झाला. नंतर पोलिस तपास करायला विसरले आणि कुटुंब आपल्या दिनचर्येत व्यस्त झाले.

तिसरा खून

मुकुंदा लोहार याच्याविरुद्ध श्‍यामकांत श्रीराम पाटील (रा. पारोळा रोड, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. श्‍यामकांत पाटील यांची आजी रुख्माबाई कडू पाटील (रा. चौधरी वाडा, किनगाव बुद्रुक) या १९ ऑक्टोबर २०२१ ला दुपारी घरात एकट्याच होत्या. त्यावेळी बाळूने त्यांची हत्या केली. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. नेहमीप्रमाणे या प्रकरणातही संशयास्पद मृत्यू असताना, पोलिसांत आकस्मिक मृत्यूचर नोंद झाल्याने त्याचा तपास झालाच नाही. याचाच गैरफायदा बाळू ऊर्फ मुकूंदा लोहारने नियोजनबद्धरित्या घेतला.

बाळूला जडला नाद

पहिल्या खुनाच्या गुन्ह्यात १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत असलेला संशयित भामटा मुकुंदा लोहार गावतच वेल्डींग दुकानावर कामाला होता. सर्वांशीच गोड बोलायचा आणि एक-दोन मित्र वगळता त्याच्याशी कुठेही उठबैसही नव्हती. मात्र, त्याला झन्नामन्ना जुगार, मटक्याचे आकडे खेळण्याचा नाद होता. वृद्धाची हत्या केल्यानंतर तो पैसे दागिने घेऊन चोपडा-शिरपूरच्या दिशेने रवाना होत असे. सराफाकडे सोने मोड झाल्यावर तो तसाच मध्य प्रदेशात बऱ्हाणपूरकडे प्रस्थान करत शानशौकी केल्यावरच गावात पाय ठेवत असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

त्या पोलिस ठाण्यांचे काय?

एकामागून एक तीन वृद्ध महिलांची हत्या होते. मृतदेहावर मारहाणीचे व्रण, गळा आवळल्याच्या खूणा असताना, तपास न करता गुन्ह्यांच्या फायली बंद होतात. कुटुंबही तेव्हा पेालिसांवर विसंबून राहते, म्हणूनच भामटा मुकुंदाची हिंमत वाढून त्याने तीन जीव घेतले. संबंधित पोलिस ठाणे आणि तपासाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना खात्यातून निष्कासित का करण्यात येऊ नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT