Accident esakal
जळगाव

Jalgaon News : ओव्हरटेक करताना नाडगावचे 2 जखमी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळ रविवारी (ता. ५) सकाळी अकराला झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यात एकाची प्रकृती गंभीर असून, त्याला खासगी रुग्णालयात (Hospital) हलविले आहे. (2 people on two wheeler were injured in an accident near Doordarshan Tower on National Highway jalgaon news)

दुरदर्शन टॉवरजवळ बोदवडकडून येणारी दुचाकीने ओव्हरटेक करताना बस समोर आल्याचे पाहून दुचाकीस्वार भांबावून गेला. दुचाकीस्वारांना बस (एमएच १४, बीटी ००९८) चालकाने वाचविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दुचाकीला कट लागला आणि बस थेट रस्त्यावरून खाली उतरून बाजूच्या शेतात घुसली. या अपघातात दुचाकीवरील कडू बावस्कर (वय २७) आणि भुरा राजपूत (वय २३, दोघे रा. नाडगाव, ता. बोदवड) जखमी झाले.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

दोघांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. जखमी कडू बावस्कार याची प्रकृती गंभीर असून, त्याला खासगी रुग्णालयात हलविले आहे. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT