Thirty First Party esakal
जळगाव

Jalgaon News : Thirty First वरील नियंत्रणासाठी 2 पथके

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दोन दिवसांनी साजरा होणाऱ्या नववर्ष स्वागतासाठी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री एकपर्यंत जल्लोष करता येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दिवसासाठी एक दिवसाची तात्पुरती मद्यविक्री व मद्यपेय परवानगीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

दरवर्षी नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले जाते. तरुणाईचा या दिवसाचा उत्साह प्रचंड असतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे नववर्ष स्वागत विशेष उत्साहाने साजरे झाले नव्हते.

त्यामुळे यंदा नववर्ष स्वागतासाठी तरुणाई, तसेच हॉटेल इंडस्ट्री सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, थर्टी फर्स्ट व नववर्ष स्वागत वीकेंडला येत असल्याने तो साजरा करण्याबाबत कमालीची उत्सुकता आहे. (2 squads for control of Thirty First party jalgaon news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

कोरोनाची धास्ती, पण..

दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे नववर्ष स्वागत जल्लोषात होऊ शकले नाही. यंदाही चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे हाहाकार उडविला असताना, भारतातही त्याबाबत सतर्कता घेतली जात आहे. सण, उत्सव साजरे करण्याबाबत निर्बंध नाहीत. मात्र, योग्य काळजी घेऊन ते साजरे करण्याबाबत निर्देश आहेत. त्यामुळे यंदाचा ‘थर्टी फर्स्ट’ साजरा होणार असून, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

रात्री एकपर्यंत जल्लोष

‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री विविध हॉटेल्स, आस्थापनांना रात्री एकपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रासंगिक निमित्ताने एक दिवसासाठी देशी मद्य परवाना दोन रुपये व विदेशी मद्य परवाना पाच रुपयाला उपलब्ध आहे. रिसोर्ट, हॉटेल्स, हॉल यांना थर्टी फर्स्टला मद्य विक्रीसाठी एक दिवसाची परवानगी देण्यात येत असून, त्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. कौटुंबिक कार्यक्रमासाठी पाच हजार आणि व्यावसायिक कार्यक्रमासाठी २० हजार रुपये शुल्क यासाठी आकारण्यात येत आहे.

दोन पथकांची नियुक्ती

‘थर्टी फर्स्ट’ला बारमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या रात्री ही पथके जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये फिरून तपासणी करतील, असे प्रभारी अधीक्षक जे. एस. गोगावले यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT