26 crore defrauding government through fake bills jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : बनावट बिलांद्वारे सरकारची 26 कोटींत फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : कुठल्याही प्रकारच्या मालाची विक्री न करता ११९ कोटींची बनावट बिले सादर करून शासनाकडून वस्तू व सेवा कर (जीएसटी) स्वरूपात तब्बल २६ कोटींची रक्कम लाटून फसवणूक केल्याप्रकरणी शिरपूर येथील सिमेंट व्यावसायिकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

‘जीएसटी’च्या जळगाव विभागात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे. ( 26 crore defrauding government through fake bills jalgaon news )

या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. संशयित व्यावसायिकास न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ‘जीएसटी’च्या जळगाव विभागात जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्हा असे कार्यक्षेत्र आहे.

काय आहे प्रकार?

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे मे. अग्रवाल असोसिएट्‍स या नावाने नैनेश संतोष अग्रवाल यांची शिरपूर व पुणे येथे सिमेंटची एजन्सी आहे. अग्रवाल यांनी खोटी व बनावट बिले सादर केल्याच्या संशयावरून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण पथकाने अग्रवाल असोसिएट्‍सची तपासणी केली असता त्यात या बनावट बिलांचा प्रकार समोर आला होता.

यात नैनेश अग्रवाल यांनी त्यांच्या एजन्सीकडून पुरवठा होणाऱ्या मालाची कुठल्याही प्रकारे विक्री न करता जवळपास ११९ कोटींची बनावट बिले सादर करीत शासनाकडून इनपूट्‍स‌ टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून २६ कोटी पाच लाखांची रक्कम लाटली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चौदा दिवसांची कोठडी

त्यांना याबाबत नोटीस बजावल्यावर ते जीएसटी कार्यालयात हजर झाले. यासंदर्भात त्यांच्याकडून कुठलेही समाधानकारक उत्तर, दस्तावेज मिळाले नाहीत. त्यामुळे यात शासनाची २६ कोटी पाच लाखांत फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यावरून नैनेश अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

यांनी केली कारवाई

राज्य कर सहआयुक्त सुभाष भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर उपायुक्त महेंद्र शिंदे, सहाय्यक राज्य कर आयुक्त संजयकुमार माहूल, राज्य कर निरीक्षक रवींद्र पोटे यांनी ही कारवाई केली. अशा प्रकारची ही जळगाव विभागातील पहिलीच कारवाई असून, राज्यातील ही नववी कारवाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT