Crime esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : 28 लाखांची 2 दुकाने परस्पर पत्नीच्या नावे; संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील नाथप्लाॅझा मार्केटमधील दोन गाळे खरेदी करण्यासाठी दहा लाख रुपये उकळून परस्पर दोन्ही गाळ्यांची खरेदी पत्नीच्या नावे करवून घेतली.

याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश सचिव विनोद देशमुख यांच्यासह चौघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (28 lakhs 2 shops in name of wife Fraud case against suspects jalgaon fraud crime news)

जानेवारी २०२१ मध्ये शहरातील नाथप्लॉझा मार्केटमधील तळमजल्यावर दिनेश व नीलेश शांताराम पाटील या दोन्ही भाऊंच्या नावे असलेल्या दोन दुकाने विक्रीला होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी पदाधिकारी विनोद पंजाबराव देशमुख व मिलिंद नारायण सोनवणे मनोज वाणी यांच्याकडे आले व त्यांनी नाथप्लॉझामधील दोन दुकाने विक्रीबाबत माहिती दिली.

विनोद देशमुख, मिलिंद सोनवणे आणि दिनेश व नीलेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निम्मे रक्कम विनोद देशमुख देणार असे ठरले. बैठकीत दुकानांसाठी २८ लाखांत सौदा ठरला.

दोन्ही दुकानांच्या सौद्यापोटी प्रत्येकी ५ लाखांचे दोन चेक मनोज वाणी यांनी दिले होते. ठरल्याप्रमाणे विनोद देशमुख यांनी पत्नी अश्‍विनी देशमुख यांनी साडेचार लाख दिनेश देशमुख यांच्या खात्यावर वर्ग केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर २६ ऑक्टोबर २०२१ ला सौदा पावती झाली. त्यात मनोज वाणी यांनी दिलेल्या रकमेच्या चेक्सचे नंबर व दिनांक चुकविली होती. याबाबत वारंवार सांगूनही सौदा पावतीत बदल करण्यात आला नाही. दिनेश पाटील, नीलेश पाटील व अश्विनी देशमुख यांनी मनोज वाणी यांना न कळवता नाथप्लॉझामधील दोन्ही दुकाने अश्विनी विनोद देशमुख यांच्या नावावर केली.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

तक्रारीत प्राप्त दस्तऐवजावरून दिनेश शांताराम पाटील, नीलेश शांताराम पाटिल, अश्विनी विनोद देशमुख, साक्षीदार गजानन धनसिंग पाटील (रा. सतखेडा), मिलिंद नारायण सोनवणे (नूतन वर्षा कॉलनी) यांना हाताशी धरून विनोद देशमुख यांनी संगनमताने कटकारस्थान रचून परस्पर व्यवहार करून फसवणूक केली. याबाबत जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी मनोज लिलाधर वाणी (वय ४२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT