cotton warehouse esakal
जळगाव

Jalgaon Crime News : नगरदेवळा येथील शेतातून 28 क्विंटल कापूस लंपास

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतात ठेवलेला दोन लाख रुपये किमतीचा २८ किलो कापूस चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (28 quintal cotton stole from Nagardeola farm Jalgaon crime news)

कापसाचे भाव कमालीचे खालावल्याने चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस शेतात व घरात साठवून ठेवला आहे. नगरदेवळा येथील दिवारसिंग राऊळ यांच्या पिंपळगाव शिवारातील शेतातील शेडमध्ये ४८ हजार रुपये किमतीचा कापूस साठवून ठेवण्यात आला होता.

तसेच राजेंद्र राऊळ यांच्या शेतातील गोदामात उमेश राऊळ यांचा दीड लाख रुपये किमतीचा कापूस साठवून ठेवला होता. या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली व त्यांनी या कापसावर डल्ला मारला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

दोन्ही शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपये किमतीचा २८ क्विंटल कापूस गोदामाचे कुलूप तोडून व शेडमधून लंपास करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा दूरक्षेत्राचे पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT