Vehicle Theft
Vehicle Theft esakal
जळगाव

Jalgaon : दुचाकी चोरी थांबता थांबेना; 3 वेगवेगळे गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहरातून दिवसाला सात वाहने चोरी होत असल्याचा अंदाज असून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपेक्षा न दाखल होणारे गुन्हेच अधिक आहेत. गुरुवारी (ता. २३) तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून बहिणाबाई शाळेजवळून, दुसरी बालाजी पेठेतून तर, तिसऱ्या गुन्ह्यातील वाहन चक्क वाघूर धरणावरून चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

भगवाननगरात बहिणाबाई शाळेजवळ गिरीष मधुकर भोळे (वय ३६) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. घराजवळच (एमएच १९ सीएन ३२६२) क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. बुधवारी (ता. २२) चोरट्यांनी घराजवळून दुचाकी लंपास केली असून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात बालाजीपेठेतील अजय राधाकृष्ण मुंगड (वय ५५) यांच्या मालकीची दुचाकी मंगळवारी (ता. २१) लंपास करण्यात आली. मुंगड यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलिस ठाण्यात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

तिसऱ्या गुन्ह्यात शेख रईस शेख मुसा पिंजारी (वय ४८ रा. नशिराबाद, ता. जळगाव) हे गृहस्थ आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून रविवारी (ता. १९) सुटीचा दिवस असल्याने उमाळा शिवारातील वाघूर धरणावर गेले होते. पंपाजवळ दुचाकी (एमएच १० सीके ६९६०) लावलेली असताना चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. शेख रईस पिंजारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक विजय खैरे, गणेश शिरसाळे, गणेश माळी करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT