corona sakal
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात दिवसभरात नवे ४०० कोरोनाबाधित

१८० कोरोनामुक्त; सक्रिय रुग्णसंख्या अडीच हजारांकडे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तिसऱ्या लाटेचा प्रत्यय देणारे नव्या बाधितांचे आकडे मंगळवारी समोर आलेत. दिवसभरात चारशेहून अधिक कोरोना (Corona)बाधित आढळून आले असून १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या अडीच हजारांच्या जवळ पोचली आहे. जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून जळगाव जिल्ह्यातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे(Third Wave of corona) चित्र दिसू लागले. दररोजच्या शंभर, दोनशेवर आढळून येणार्या नव्या रुग्णांनी रविवारी तीनशेचा टप्पा पार केला. सोमवारी २१७ नवे बाधित आढळून आल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला. मात्र, लगेच दुसर्याच दिवशी मंगळवारी तब्बल ४०९ नवे रुग्ण समोर आले.

चाचण्याही वाढल्या

बुधवारी २८८१ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४०९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मंगळवारी चाचण्यांचा आकडा वाढल्याचे दिसून आले. तर एकाच दिवसात तब्बल १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता २४७८ झाली असून पैकी २४२२ रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, किंवा सौम्य लक्षणे आहेत. केवळ ५६ रुग्णांमध्येच लक्षणे आहेत. त्यापैकी ९ जण ऑक्सिजनवर असून केवळ एक रुग्ण आयसीयूत आहे.

जळगाव शहर हॉटस्पॉट

पहिल्या दोन्ही लाटेंप्रमाणेच या लाटेतही जळगाव शहर, भुसावळ तालुका हॉटस्पॉट ठरले आहे. जळगाव शहरात मंगळवारी तब्बल १५८ रुग्ण आढळून आले. तर शहरातील ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. भुसावळ तालुक्यात १०६ रुग्णांची भर पडली. तर ७३ रुग्ण बरे झाले. बोदवड वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मंगळवारी रुग्ण आढळून आलेत. अन्य ठिकाणी आढळलेले रुग्ण असे : जळगाव ग्रामीण १८, अमळनेर ५, चोपडा ४३, पाचोरा ९, भडगाव १३, धरणगाव ६, यावल १, एरंडोल २, जामनेर ५, रावेर ४, पारोळा ९, चाळीसगाव ७, मुक्ताईनगर २०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT