Guardian Minister Gulabrao Patil inspecting the special newborn care room. District Collector Ayush Prasad, CEO Ankit, esakal
जळगाव

Jalgaon News : 5 कोटींतून विशेष नवजात शिशू कक्ष सुरु

ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मधील व‍िशेष नवजात शिशू काळजी कक्षाचे (स्पेशल न्यू बार्न केअर युनिट-एसएनसीयू) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मधील व‍िशेष नवजात शिशू काळजी कक्षाचे (स्पेशल न्यू बार्न केअर युनिट-एसएनसीयू) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

एसएनसीयू युनिटच्या माध्यमातून ज‍िल्ह्यातील नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल, असा व‍िश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. (5 crore to start special newborn room jalgaon news)

जिल्हा नियोजन ५ कोटी ५७ लाखांच्या न‍िधीतून ज‍िल्हा रूग्णालयात सुरु करण्यात आलेल्या एसएनसीयू युनिटचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले.

ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अध‍िकारी अंकित, ज‍िल्हा शल्य च‍िक‍ित्सक डॉ.क‍िरण पाटील, डॉ.ग‍िर‍िष ठाकूर, डॉ.शैलेजा चव्हाण व डॉ.इंद्रानी म‍िश्रा आदी यावेळी उपस्थ‍ित होते.

व‍िशेष नवजात शिशू काळजी कक्षाची यावेळी पालकमंत्र्यांनी पाहणी केली. एसएनसीयू युनिटच्या नूतनीकरणासाठी ज‍िल्हा वार्ष‍िक योजनेतून ५ कोटी ५७ लाखांचा न‍िधी मंजूर करुन त्यातून नूतनीकरण करण्यात आले.

या आहेत सुविधा...

या कक्षात ४५ युनिटसह अत्याधुनिक कृत्रीम श्वासाचे मशिन व रेड‍ियंट वॉर्मर उपलब्ध आहेत. कमी वजनांच्या व कमी दिवसांच्या नवजात बालकांवर सर्व प्रकारच्या उपचारासाठीच्या सुविधा आहेत.

जन्मजात न रडलेले तसेच अध‍िक प्रमाणात कावीळ असणाऱ्या बाळांवर उपचार सुविधा उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांत खूप खर्च येतो अशा सुव‍िधा व‍िनामूल्य या कक्षात उपलब्ध असल्याची माह‍िती डॉ. पाटील यांनी ‍दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News: नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे अमोल मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT