jalgaon zilha parishad esakal
जळगाव

Jalgaon ZP News : जिल्हा परिषदेत सहाशेवर रिक्त पदे भरणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon ZP News : ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात १८ हजार पदे सर्व जिल्हा परिषदेंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार आहेत. (6 hundred vacancies will be filled in ZP jalgaon news)

त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेत गट ‘क’मध्ये १६ संवर्गातील जवळपास ६१२ पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.

यासंदर्भात आयबीपीएस या कंपनीशी सामंजस्य करार होऊन जाहिरातीशी संबंधित कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अशी होणार भरती

यासोबतच एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून, तर २० टक्के पदे अनुकंपाची या भरती प्रक्रियादरम्यानच भरण्यात येणार आहेत, असेही डॉ. आशिया यांनी कळविले आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

रिक्त पदे १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य व इतर विभागांतील संवर्गाच्या पद भरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे २१ ऑक्टोबर २०२२ व १५ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता.

त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांची बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पद भरतीची परीक्षा आयबीपीएस या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जळगाव जिल्हा परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात असून, लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अर्ज दाखल केल्यापासून परीक्षेपर्यंत उमेदवारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे. ०२५७-२२२४२५५ या हेल्पलाइन क्रमांकावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT