jalgaon crime esakal
जळगाव

Jalgaon Crime : केक कापताना वाद; उसळली दंगल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील सम्राट कॉलनीत वाढदिवसाचा केक कापताना झालेल्या वादातून उसळलेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. (8 suspects arrested for stone pelting in Samrat Colony jalgaon crime news)

सम्राट कॉलनीत बुधवारी (ता. १७) रात्री दहाच्या सुमारास जिशांत ऊर्फे दिशू युनूस शिकलीकर (रा. मासूमवाडी) याच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्यानंतर काहींनी एकमेकांवर अंडे मारण्यास सुरवात केली.

त्यातून वाद होऊन त्याठिकाणी अचानक जमलेल्या तरुणांनी दगडफेक केली. यात दोन मालवाहू रिक्षा आणि दोन दुचाकींचे नुकसान झाले. दगडफेकीमुळे सम्राट कॉलनीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धरपकड करण्यास सुरवात केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी जिशांत शिकलीकर, शकीब फारूख पटेल, उमर ऊर्फ गोलू जावेद शेख, परवेज ऊर्फ तिरंग खान युनूस खान, रिुक मुसा पटेल, सय्यक अकिब सय्यद वाहेद, अफसर जाकीर शेख, नईम बंडू शिकलीकर (सर्व रा. मासूमवाडी) यांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलिस नाईक छगन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी (ता. १८) रात्री एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT