9 more brands of bottled water beside Railnir for railway jalgaon news esakal
जळगाव

Railway Bottle Water : रेलनिलव्यतिरिक्त बाटलीबंद पाण्याचे आणखी 9 ब्रँड; रेल्वे प्रशासनाची माहिती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यासह राज्यात तापमानाने अंगाची लाहीलाही होत आहे. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांना तर प्रत्येक स्थानकावर पाणी लागत आहे. गाडीतही पाणी लागते. (9 more brands of bottled water beside Railnir for railway jalgaon news)

रेल्वेत प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, ती पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडे बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे आणखी नऊ ब्रँडचा साठा करण्यासह रेल्वेस्थानके आणि परिसरात विक्री करण्यासाठी उपलब्ध आहेत.

हे ब्रँड सक्षम प्राधिकरणाद्वारे नियमितपणे तपासले जातात आणि प्रमाणित केले जातात, अशी माहिती भुसावळ रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भुसावळ, अंबरनाथ (मुंबई) आणि इतर ठिकाणी उत्पादन आणि बाटलीबंद सुविधेसह भारतीय रेल्वेचा बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा ब्रँड असलेल्या रेलनिलव्यतिरिक्त उपरोक्त ब्रँड्सच्या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे रेल्वेचा पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इतर ९ मंजूर ब्रँड्सना रेल्वेने स्थानकांवर पाणी विकण्याची परवानगी दिली आहे.

हे आहेत नवीन ब्रँड्स

‘ऑक्सिमोर ॲक्वा’, ‘रोकोको’, ‘हेल्थ प्लस’, ‘गॅलन्स’, ‘निंबस’, ‘ऑक्सी ब्लू’, ‘सन रिच’, ‘एल्विश’, ‘इयोनिटा’.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Election 2026 : तामिळनाडूत 'विजय युग' सुरू, सरकार स्थापनेचा केला दावा; राहूल गांधींची साथ मिळणार ?

Pargaon Crime : विवाहित मुलीचे दुसरे लग्न लाऊन देण्याच्या उद्देशाने वडीलांनीच केले अपहरण; वडीलांसह सात आरोपींना चार तासांत अटक

ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलच्या टपावर तरुणाचा थरारक प्रवास, वाहतूक कोलमडली, रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा; Video Viral

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Tailoring Business : रेडिमेडच्या जमान्यात शिवणकाम व्यवसायाला नवसंजीवनी! ‘परफेक्ट फिटिंग’साठी महिलांची पसंती

SCROLL FOR NEXT