kissan rail
kissan rail esakal
जळगाव

जळगाव : किसान रेल्वेच्या ९०० फेऱ्या पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : १ जानेवारीला मध्य रेल्वेने(central railway) सावदा ते आदर्शनगर (दिल्ली) किसान रेल्वेची(farmer train) ९०० वी फेरी केली. मध्य रेल्वेवर ९०० फेऱ्या पूर्ण करणारी किसान रेल शेतकऱ्यांची समृद्धी करणारी सर्वांत यशस्वी आणि सर्वांत मोठा बदल करणारा उपक्रम ठरला आहे.

जलद वाहतूक(fastest trasnport), शून्य अपव्यय, ५० टक्के अनुदानासह कृषी उत्पादनासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून किसान रेलने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्धी, आनंद आणि आशा निर्माण केली आहे. पहिली किसान रेल्वे सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या ९०० फेऱ्यांमधून तीन लाख दहा हजार ४०० टन नाशवंत मालाची वाहतूक केली आहे. ७ ऑगस्ट २०२० मध्ये पहिली किसान रेल आणि २८ डिसेंबर २०२० ला किसान रेलची शंभरवी फेरी चालविण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला होता. ज्याला पंतप्रधानांनी वेबलिंकद्वारे हिरवा झेंडा दाखविला होता. किसान रेलची ५०० वी फेरी १२ ऑगस्ट २०२१ ला झाली. आता किसान रेल्वेची ९०० वी फेरी १ जानेवारी २०२२ ला सावदा ते आदर्शनगर (दिल्ली) निघाली.

सोलापूर विभागातील डाळिंब, द्राक्षे, लिंबू, शिमला मिरची, कस्तुरी खरबूज, पेरू, सीताफळ, बेर (भारतीय मनुका), लातूर आणि उस्मानाबाद विभागातील फुले, नाशिक विभागातील कांदे, भुसावळ आणि जळगाव विभागातील केळी, नागपूर विभागातील संत्री आणि इतर फळे व भाजीपाला किसान रेलच्या माध्यमातून दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालसारख्या दूरच्या बाजारपेठांमध्ये त्वरित पोचतात. मोठ्या बाजारपेठांसह चांगला महसूल, तसेच त्यांच्या उत्पादनाची चांगली किंमत, जलद वाहतूक, कमीत कमी वाया जाणे या कारणांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. किसान रेल हे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी विकास आणि समृद्धीचे इंजिन बनले आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘ऑपरेशन ग्रीन- टॉप टू टोटल’ या सरकारच्या व्हीजनचा एक भाग म्हणून सरकारने शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले आहे. त्या मुळे शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी रेल्वे ही पहिली पसंती ठरली आहे.

किसान रेलच्या ९०० फेऱ्या या जलद आणि सुरक्षित वाहतूक, तसेच नवीन मोठ्या बाजारपेठांमधील प्रवेशासह शेतकऱ्यांना त्याचे प्रचंड फायदे अधोरेखित करतात. मध्य रेल्वे सध्या देवळाली- मुझफ्फरपूर, सांगोला -मुझफ्फरपूर, सांगोला- आदर्शनगर दिल्ली, सांगोला- शालिमार, रावेर- आदर्शनगर दिल्ली आणि सावदा - आदर्शनगर (दिल्ली) या ६ किसान रेल चालवीत आहे.

-अनिलकुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT