sand mafia
sand mafia  esakal
जळगाव

Jalgaon News : सोडलेले डंपर साहेबाच्या आदेशाने पुन्हा ताब्यात; आधी तलाठ्याची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील अजिंठा चौकात वाळूचे डंपर अडवून चिरीमिरी झाल्यावर सोडण्यात येते. त्याच वेळेस ‘वरून’ फोन आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार घेऊन तेच तलाठी दीपनगरपर्यंत पाठलाग करून पुन्हा डंपर ताब्यात घेतात. (Abandoned dumper retaken by police due to order of Senior officers jalgaon news)

त्याच्यावर कठोर कारवाई करतात. या सर्व प्रकरणात ठरल्यापेक्षा निम्मेच हप्ता दिल्याने साहेबांची नाराजी होते अन्‌ त्यातून ही कारवाई झाल्याची चर्चा महसूल वर्तुळात चांगलीच रंगलीय.

जळगाव जिल्ह्यात राजकीय आश्रयाला असलेल्या वाळूमाफियांनी रान माजविले आहे. काही केल्या महसूल, पोलिस आणि राज्य शासन बेकायदेशीर वाळू व्यवसायावर निर्बंध लादण्यास असमर्थ ठरतेय. कारवाईच्या नावे रात्रभर वसुलीत मग्न महसूल पथकामुळे रस्त्यावर वाळू वाहतूकदारांच्या रूपात जणू ‘यम’ उतरविले आहेत.

वर्षभरात होणाऱ्या एकूण अपघातात ३० टक्के वाटा वाळू वाहतूकदारांमुळे होणाऱ्या अपघातांचा आहे. हे माहिती असूनही महसूली कारवाईचा तमाशा करण्यात येतो. इतके करूनही बेकायदा वाळू उत्खनन आणि वाहतूक कोणीच बंद करू शकत नाही.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

अजिंठा चौकात सोडले ते डंपर

जळगावातील मेहरुणचे तलाठी राजू बाऱ्हे यांनी गुरुवारी (ता. १३) मध्यरात्री अजिंठा चौकात सुसाट वाळू डंपर (एमएच २२, एए २९०८) अडवून पावतीची मागणी केली. चालकाने गुजरात राज्याची पावती साहेबांच्या हाती टेकवली. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने कारवाईचा धाक दाखवूनही जमत नाही म्हटल्यावर डंपर जप्तीची वेळ आली.

अखेर चालक व मालकाने जागेवरच २५ हजारांचा ‘साहेबी दंड’ देत डंपर सोडवत मार्गस्थ केले. थोड्याच वेळात तलाठींना ‘हॉटलाईनद्वारे’ फोन आल्यावर त्यांनी आपली कामगिरी सांगितली. साहेब खुश होण्याऐवजी संतापले.

मग त्या वाहनाच्या जप्तीचे फर्मान सोडण्यात आले. इतकेच नाही, तर चक्क साहेबांची कार (एमएच १९, सीवाय ९९९१) घेऊनच तलाठी त्या डंपरच्या मागे सुसाट वेगात पाठलाग करीत सुटले. दीपनगर (वरणगाव) येथे डंपर ताब्यात घेत ते जळगावला आणून जप्त दाखविण्यात आले.

वाळूमाफिया-वाहतूकदारांना ओळखायची त्यांची ‘पारखी नजर’ आणि कामाचा धडका पाहता वरिष्ठांनीच या तलाठ्यास जामनेरसह जळगाव संस्थांनची महसुली जबाबदारी सोपवल्याचे महसूल विभागातील अधिकारी सांगातात.

भूसंपादनाची गाडी वसुलीवर?

गुरुवारी ज्या कारने पाठलाग करून तलाठ्यांनी वाळूडंपर वरणगावात ताब्यात घेतले, ती कार मुळात भूसंपादन विभागाच्या कामासाठी भाडे तत्वावर घेतली आहे. या वाहनाची पिवळी नंबरप्लेट काढून साध्या नंबरप्लेटवर महसुलचे पथक वसुलीसाठी वापरत असल्याची खात्रीलायक माहिती डंपर जप्ती प्रकरणानंतर अधिकाऱ्यांनी दिली.

"संबंधित डंपरकडून दंड वसूल केलेला नाही. डंपर जप्त करून आणण्याचे आदेश असल्याने डंपर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात आणले आहे." -राजू बाऱ्हे, तलाठी, मेहरूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या VVIP ड्युटीवर बोगस डॉक्टर, अयोध्या दौऱ्यात भयंकर सुरक्षा त्रुटी

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update: स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या माजी 'पीए'ला समन्स

SCROLL FOR NEXT