Accident News esakal
जळगाव

Accident News : मुलीची भेट स्मरणी ठेवत पित्याचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : लहान मुलीला भेटण्यासाठी मोठ्या मुलीसोबत निघालेल्या दुचाकीस्वार पित्याला भरधाव ट्रकने जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ चिरडल्याची दुदैवी घटना शनिवारी (ता. ३१) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला असून, नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू दीपक कोळी (वय ४५, रा. चारठाणा, ता. मुक्ताईनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, चारठाणा (मुक्ताईनगर) येथे राजू कोळी कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीकाम करून उदरनिर्वाह करत होते. भडगाव येथील लहान मुलीला भेटण्यासाठी राजू कोळी दुचाकीने जळगावहून निघाले. (Accident News truck attack on two wheeler dad death daughter injured Jalgaon news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

दुपारी साडेबाराच्या सुमारास शिरसोली गावापुढील रामदेववाडी गावाजवळच समोरून भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राजू कोळी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली मोठी मुलगी सोनी कोळी ही गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती.

एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी स्वप्नील पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शववाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविले. तर जखमीस तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मन हेलवणारा आक्रोश केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT