Encroachment in Phule Market. esakal
जळगाव

Jalgaon News : अतिक्रमण रोखण्यासाठी दुकानदारांवरच कारवाई

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील अतिक्रमणावर कारवाई करूनही महापालिकेतर्फे त्यांना आळा घातला जात नाही.

आता नवीन उपाय शोधण्यात आला आहे. (Action will be taken against shopkeepers to prevent encroachment jalgaon news)

मार्केटमधील दुकानदारांनाच नोटीस बजावण्यात येत आहे. ‘तुमच्या दुकानासमोर अतिक्रमणधारक किंवा त्याचे साहित्य दिसल्यास आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल’, असे नोटिशीत म्हटले आहे.

शहरातील फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील अतिक्रमण महापालिका व विक्रेत्यांचीही डोकेदुखी ठरली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे अनेकवेळा कारवाई करण्यात आली. मात्र, पुन्हा ते अतिक्रमण होते. विशेष म्हणजे ते अतिक्रमण कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे.

दुकानादारांवरही आरोप

अतिक्रमण होण्यास काही दुकानदारच जबाबदार असल्याचा आरोप महापालिका प्रशासनातर्फे केला जात आहे. दुकानदार आपल्या दुकानासमोरील जागेवर दुकाने लावण्यासाठी, तसेच त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी अतिक्रमणधारकांकडून भाडे घेत असतात. दुकानदारांच्या या संरक्षणामुळेच प्रत्येक दुकानासमोर अतिक्रमण होत आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

दुकानदारांतर्फे अतिक्रमण काढण्याचीच मागणी

महापालिका प्रशासनातर्फे होत असलेल्या आरोपाचे फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील दुकानदारांनी खंडन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की आम्ही अनेकवेळा अतिक्रमणधारकांना हटवावे, म्हणून महापालिकेला पत्र दिले आहे. आम्हाला अतिक्रमणधारकाकडून भाडे मिळाले असते, तर आम्ही पत्र का दिले असते. त्यामुळे महापालिकेचा हा केवळ बहाणा असल्याचा आरोपही दुकानदारांनी केला आहे.

"दुकानदारांना नोटीस देत असाल, तर प्रथम अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करा. अगोदर त्यांना हटवून पर्यायी जागा द्या, त्यानंतरही ते पुन्हा बसतील, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. केवळ दुकानदारांना नोटीस देणे चुकीचे आहे." -राजेश वरयाणी, सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT